अकोला - शासकीय दूध डेअरी परिसरातील जलकुंभानजीक रविवारी दुपारी भीषण आग लागली. दुधाच्या खाली कॅरीबॅगच्या मोठया साठय़ाला लागलेल्या या आगीने रौद्र रूप धारण केले होते. या आगीची माहिती अग्निशमन विभागाला मिळताच एक बंब पाण्याने आग आटोक्यात आणण्यात आली. जलकुंभानजीकचा कचरा या आगीत जळून खाक झाला असून, त्यानजीकच असलेल्या एका कार्यालयातील साहित्यही काही प्रमाणात जळाल्याची माहिती आहे. शासकीय दूध डेअरी परिसरातील अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे ही आग लागल्याची माहिती आहे. शासकीय दूध डेअरी परिसरात एवढी भीषण आग लागली असताना एकाही अधिकार्याने डेअरी परिसरात येण्याची तसदी घेतली नाही. तर आजुबाजुच्या नागरिकांनी या आगीची माहिती अग्निशमन विभागाला दिली होती.
शासकीय दूध डेअरी परिसरात आग
By admin | Published: April 11, 2016 1:30 AM