खेट्री : येथून जवळच असलेल्या सस्ती येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घराला व गोठ्याला आग लागल्याची घटना ३ मे रोजी दुपारी घडली. या आगीत घरातील साहित्य जळून खाक झाले तर गोºहा ठार झाला. काही गुरांनाही ऱ्हा या आगीची झळ बसली.सस्ती येथील अल्पभूधारक शेतकरी राजेंद्र श्रीराम काळे यांच्या घराला आग लागल्याची घटना शुक्रवारी 3 मे रोजी दुपारी घडली. या आगीमध्ये घर व गोठा जळून खाक झाले. आग लागल्याचे वृत्त गावात पसरताच ग्रामस्थ महिलांनी पुढाकार घेऊन आग विजवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर आग आटोक्यात आल्यानंतर पातूरची अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली. या घटनेमध्ये गोठ्यात बांधलेला एक गोरा जळाल्यामुळे दगावला आहे, तर एक गोरा जखमी झाला आहे. तसेच घरातील रासायनिक खत, जनावरांचे कुटार ,धान्य, शेती, अवजारे व घरगुती सामान जळून खाक झाले आहे.असा एकूण एक लाखापर्यंत नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.सदर घटनेची माहिती पोलीस पाटील अरुण प्रल्हाद बदरखे यांनी चान्नीचे ठाणेदार प्रकाश झोडगे व तहसीलदार यांना दिली.ठाणेदार प्रकाश झोडगे व महसूल विभागाचे मंडळ अधिकारी तलाठी घटनास्थळी दाखल झाले आणि घटनेचा पंचनामा करण्यात आला. या घटनेमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई करून देण्याची मागणी राजेंद्र काळे सह ग्रामस्थांकडून होत आहे.(वार्ताहर)
सस्ती येथे शेतकऱ्याच्या घर व गोठ्याला आग; गोऱ्हा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2019 6:34 PM