लोकमत ऑनलाइन
वाशिम : आग लागण्याच्या संभाव्य आपत्तीवर वेळीच नियंत्रण मिळविता यावे, यासाठी शासकीय कार्यालयांसह निवासस्थानांमध्ये अग्नी अवरोधक यंत्र बसविण्यात आले आहेत. मात्र, त्याची तब्बल सन २००७ पासून ह्यरिफिलिंगह्णच झाली नाही. त्यामुळे १० वर्षे मुदतबाह्य ठरलेले हे अग्नी अवरोधक यंत्र केवळ शोभेची वस्तू म्हणून उरले आहेत. आवश्यक निधीस मंजूरात आणि इतर प्रक्रिया लालफितशाहीत रेंगाळल्यामुळे गत १० वर्षांपासून शासकीय निवासस्थानांमधील अग्नी अवरोधक यंत्रांची ह्यरिफिलिंगह्ण झालेली नाही. यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळासाहेब बोराडे यांच्याशी संपर्क साधला असता, मार्च २०१७ पूर्वी शासकीय निवासस्थानांमधील अग्नि अवरोधक यंत्रांची ह्यरिफिलिंगह्ण करण्याचे प्रस्तावित असल्याचे त्यांनी सांगितले.