२५ लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाजपातूर : पातूर-वाशिम रस्त्यावरील बंटी गहीलोत यांच्या व्हॉईट कोल बनविण्याच्या कारखान्यास १0 एप्रिलच्या सकाळी ९.३0 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सुमारे २५ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.बंटी गहीलोत यांच्या सदर कारखान्याबाहेर हजारो क्विंटल वजनाचे कुटार ठेवण्यात आलेले आहे. त्यावरून महावितरण कंपनीची वीज वितरण करणारी विद्युत वाहिनी गेलेली असून, त्या विद्युत तारांचे परस्परांशी घर्षण झाल्यामुळे सोमवारी सकाळी ९.३0 वाजता ही आग लागली. या आगीने कारखान्यातील कुटारांसोबतच शेजारील शेतांमधील पिकांचेदेखील नुकसान झाले.या आगीची माहिती देण्यात येताच पातूर , बाळापूर व अकोला येथील अग्नीशामक वाहने पोहोचली. हे वृत्त लिहीपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती. सदर कारखान्यास आग लागल्याचे वृत्त कळताच तहसीलदार राजेश वझिरे , सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे यांच्यासह गावकरी घटनास्थळी पोहोचले. ते आग विझविण्यासाठी प्रयत्नशील आहेत.(वार्ताहर)
पातूर येथे व्हाईट कोल कारखान्यास आग
By admin | Published: April 10, 2017 4:15 PM