शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

लोणारच्या ग्रीन हाऊसिंग प्रकल्पाला प्रथम पुरस्कार

By admin | Published: March 15, 2015 12:03 AM

राष्ट्रीय पातळीवर गौरव; केंद्र सरकारने घेतली दखल.

मयुर गोलेच्छा/लोणार (जि. बुलडाणा) : केंद्र सरकार, राज्य सरकार व नगर पालिकेच्यावतीने येथे सुरू असलेल्या ६00 घरकुलांच्या महत्वाकांक्षी ग्रीन हाऊसिंग प्रकल्पालाची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. नवीन व ऊर्जा मंत्रालयाचे मुख्य सचिव भूपेंद्र त्रिपाठी यांच्या हस्ते शुक्रवारी लोणार नगरपरिषदेला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्काराने गौरविण्यात आले. येथील खार्‍या पाण्याच्या सरोवर परिसरात वाढत्या मानवी हस्तक्षेपाला पायबंद घालण्याकरीता सरोवर काठावरील अतिक्रमीतधारकांसाठी शहरापासून १ किमी अंतरावर केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास योजनेंतर्गत पर्यावरणपूरक ग्रीन हाऊसिंग प्रकल्पाचे काम सुरू आहे. केंद्र शासनाच्या नविन व नविनीकरण उर्जा मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार घरांच्या बांधकामात शाश्‍वत साहित्याचा वापर केला जात आहे. यामुळे हा प्रकल्प देशात महत्वपूर्ण ठरला असून नवीन आणि नविनीकरण उर्जा मंत्रालयाच्या शाश्‍वत अधिवास विकास आणि संशोधन संस्था, एकात्मीक आवास ग्रीन रेटींगकडून लोणार नगर परिषदेला हा पुरस्कार मिळाला. या मंत्रालयाचे मुख्य सचिव भुपेंद्र त्रिपाठी यांच्याहस्ते नगराध्यक्षा रंजना राजेश मापारी, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, न. प. चे कनिष्ठ अभियंता अजय हाडोळे, तांत्रिक सल्लागार मनिष भुतडा यांनी हा पुरस्कार स्वीकारला.