शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

पश्चिम विदर्भातील पहिली नेत्रपेढी होणार अकोल्यात

By admin | Published: November 05, 2016 9:49 PM

नेत्रदानाच्या क्षेत्रात अकोल्याचे महत्व वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर आता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढी स्थापण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत

अतुल जयस्वाल / ऑनलाइन लोकमत 
अकोला, दि. 5 - नेत्रदानाच्या क्षेत्रात अकोल्याचे महत्व वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर आता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढी स्थापण करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास सादर करण्यात आला असून, सार्वजनिक आरोग्य सेवेकडून हिरवी झेंडी मिळाल्यास लवकरच नेत्रपीढी सुरु करण्यात येणार आहे. तसे झाल्यास ही पश्चिम विदर्भातील पहिली नेत्रपीढी ठरणार आहे.
वैद्यकीय क्षेत्रात नेत्रदानास अनन्यसाधारण महत्व आहे. एकाच्या नेत्रदानाने दोघांना दृष्टी प्राप्त होऊ शकते. नेत्रदानाबाबत वाढत्या जनजागृतीमुळे अकोल्यात मरणोत्तर नेत्रदानाचा टक्का वाढला आहे. मरणोत्तर नेत्रदान करणाºयांचे नेत्रगोलक संकलित करून ते नेत्रपेढीत ठेवण्यात येतात. तेथे प्रतीक्षा यादीत असलेल्या नेत्रहिनांवर नेत्रांचे प्रत्यारोपण करण्यात येते. सध्या विदर्भात केवळ नागपूर येथेच नेत्रपेढी आहे. पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा व वाशिम या जिल्ह्यातील लोकांना नागपूर दुर पडत असल्याने सद्या येथे संकलित केलेले नेत्रगोलक जालना येथील नेत्रपेढीकडे पाठविले जातात. पश्चिम विदर्भातील अकोला शहराचे वैद्यकीय क्षेत्रातील महत्व आणि येथील नेत्रदानाचा टक्का बघू जाता येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढी स्थापण करण्याच्या हालचाली अनेक महिन्यांपासून सुरु होत्या. येथील नेत्रविभाग त्या दृष्टीने सज्ज आहे. आता नेत्रपेढी स्थापण करण्याचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून गत महिन्यात जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास सादर करण्यात आला आहे. तेथून हा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत येत असलेल्या ‘ह्यूमन आॅर्गन ट्रान्सप्लांट अथॉरिटी’ अर्थात मानवी अवयक प्रत्यारोपन प्राधिकरण (होटा)कडे सादर करण्यात येणार आहे.  प्रस्ताव गेल्यानंतर ‘होटा’च्या चमूकडून  येथील पायाभूत सुविधांचे पाहणी होईल व त्याबाबतचा अहवाल आरोग्य सेवेला सादर करण्यात येईल. सर्वकाही सुरळीत झाले, तर लवकरच येथे नेत्रपेढी सुरु करण्यात येईल. अकोल्यात नेत्रपेढी स्थापण झाल्यास त्याचा फायदा संपूर्ण पश्चिम विदर्भाला होणार आहे.
 
‘जीएमसी’चा नेत्र चिकित्सा विभाग सज्ज
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढी सुरु करण्यासाठी येथील नेत्रचिकित्सा  विभाग पूर्णपणे सज्ज आहे. नेत्रपेढीसाठी आवश्यक सर्व यंत्रसामुग्री व इतर साहित्य येथे उपलब्ध आहे. ‘होटा’कडून मंजुरी मिळाली तर आजरोजी येथे नेत्रपेढी सुुरु केली जाऊ शकते. 
 
‘होटा’ची मंजुरी गरजेची
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढी सुरु करण्याबाबतचा प्रस्ताव ‘सीएस’कार्यालयाकडून ‘होटा’कडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे नेत्रपेढीसाठी ‘होटा’ची मंजुरी मिळणे आवश्यक आहे.
 
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेत्रपेढी स्थापण करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. मंजुरी मिळाल्यास आजरोजी नेत्रपीढी सुरु करण्याएवढा येथील नेत्रचिकित्सा विभाग सज्ज आहे. - डॉ. कुसुमाकर घोरपडे, प्रभारी अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला.