शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
6
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
7
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
8
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
9
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
13
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
14
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
15
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
16
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
17
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
18
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
19
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

घरकुलाच्या प्रथम हप्त्यात कपातीने लाभार्थी भांबावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:13 PM

अकोला : प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पहिल्या हप्त्याच्या रकमेत दहा हजारांची कपात करून केवळ १५ हजार रुपये दिले जात आहेत.

अकोला : प्रधानमंत्री आवास योजनेसह विविध घरकुलांची कामे सुरू करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पहिल्या हप्त्याच्या रकमेत दहा हजारांची कपात करून केवळ १५ हजार रुपये दिले जात आहेत. त्यातून जोत्यापर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ता देण्याचा पवित्रा शासनाने घेतल्याने राज्यातील हजारो लाभार्थी भांबावले आहेत. २०१८-१९ मध्ये निवड झालेल्या लाभार्थींना पहिल्या हप्त्याची रक्कम १५ हजार रुपये खात्यात टाकणे सुरूही झाले आहे.देशभरात २०२२ पर्यंत सर्वांनाच घरे, या संकल्पनेनुसार ग्रामीण आणि शहरी भागातील लाभार्थींसाठी आवास योजना सुरू झाली आहे. योजनेसाठी २०११ मध्ये झालेल्या आर्थिक, सामाजिक, जातीनिहाय सर्वेक्षणातून लाभार्थींची संख्या निश्चित झालेली आहे. त्या संख्येनुसार सर्वांनाच घरे देण्याचे आव्हान आता शासनापुढे आहे. सर्वेक्षणानुसार घरकुलासाठी अकोला जिल्ह्यात एकूण ६७ हजार लाभार्थी पात्र आहेत. त्यातील हजारो लाभार्थी अद्यापही वंचित आहेत.त्यातच आता २०१८-१९ मध्ये निवड झालेल्या लाभार्थींना घरकुलाचे हप्ते देताना रकमेतही कपात करण्यात आली आहे. पहिल्या हप्त्याची रक्कम सपाट प्रदेशात १५ हजार, तर डोंगराळ भागात २० हजार रुपये देण्यात येत आहेत.- चार हप्त्यात मिळेल रक्कम!सपाट प्रदेशात १५ हजार रुपयांत जोते पूर्ण केल्यानंतर दुसरा हप्ता ४५ हजार, लिंटेल पूर्ण केल्यानंतर ४० हजार रुपये, शौचालयासह घरकुल पूर्ण केल्यानंतर २० हजार रुपये दिले जाणार आहेत.- वाळूच्या ट्रकची किंमत १२ हजारशासनाने जोते पूर्ण करण्यासाठी दिलेल्या रकमेतून लाभार्थी केवळ एक वाळूचा ट्रक खरेदी करू शकतात. इतर साहित्य उधारित घेऊन जोते पूर्ण करण्याची वेळ शासनाने गरीब लाभार्थींवर आणली आहे. त्यातच गरीब लाभार्थींना उधारीतही साहित्य मिळत नसल्याने ते भांबावले आहेत.- गावांमध्ये दलाल सक्रियरमाई आवास योजनेचा लाभ मिळवून देण्याचे आमिष देऊन गावांमध्ये १० ते १५ हजार रुपये उकळणारे दलाल सक्रिय आहेत. त्यामध्ये काही ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवकही मागे नाहीत. त्यांना हाताशी धरून काही पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांनी मंजूर घरकुलाची संख्या ठरवून दिली. या प्रकाराने अधिकारीही रक्कम उकळण्यासाठी दलालांना प्रवृत्त करीत असल्याचीही माहिती आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाgovernment schemeसरकारी योजना