मूर्तिजापूर(जि.अकोला): समाजात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पोलीस प्रशासनापुढे नवनवी आव्हाने निर्माण होत आहेत. खून, मारामार्या, दरोडा, चोर्या अशा घटनांचा परिणाम कायदा व सुव्यवस्था राखणार्या पोलीस यंत्रणेवर होतो. अशा परिस्थितीत अवघ्या तीन महिन्यातच परीविक्षाधीन पोलीस अधिकारी निमित गोयल यांनी माना पोलीस ठाण्याला अमरावती परिक्षेत्रात प्रथमच आंतरराष्ट्रीय (आयएसओ) मानांकन मिळवून दिले आहे. गुन्हेगारीवर अंकुश ठेवीत प्रशासकीय कामात अत्याधुनिक सुसूत्रता आणून त्यांनी आदर्श घडविला असून हे कार्य इतरांसाठी अनुकरणीय ठरणारे आहे.राज्यात कर्तृत्ववान पोलिसांची कमी नाही. अनेक पोलीस अधिकारी स्वत:चा जीव धोक्यात घालून सामाजिक सुरक्षा करीत आहेत. समाजातील निर्माण झालेल्या समस्यांना सोडविण्यासाठी कर्तव्य चोख बजावतात. गुन्हेगारीवर वचक ठेवतात. परीविक्षाधीन पोलीस अधिकारी (भाप्रसे) निमित गोयल यांनी एप्रिल २0१६ ला तालुक्यातील माना पोलीस ठाण्याचा प्रभार सांभाळला. माना पो. स्टे. अंतर्गत गावांची लोकसंख्या ७५ हजाराच्या जवळपास आहे. मानाअंतर्गत ३१ ग्रामपंचायती येतात. ५१ कार्यक्षेत्राचा भार सांभाळून गोयल यांनी आपल्या कार्याचा धडका सुरू केला. सुयोग्यतेने गुन्हेगारीची प्रकरणे हाताळली. एकमेकांविषयी निर्माण झालेले समज-गैरसमज दूर करण्यात यशस्वी ठरून ३0 गावे तंटामुक्ती केली आहे. परीविक्षाधीन पोलीस अधिकारी निमित गोयल यांनी हे सर्व निकष अवघ्या तीन महिन्यातच ९0 टक्के पूर्ण केले आहे. ठाण्याच्या इमारतीची डागडुजी, रंगकाम, कंपाउंड, बोअरवेल, सौरऊर्जा दिवे व्यवस्था, संगणकीकरण यासह बिनतारी संदेश कक्ष, स्टेशन डायरी कक्ष, गुन्हे विभाग कक्ष, बारनिशी मोहरर कक्ष, मुद्देमाल कक्ष, आदी विभाग सुसज्ज करण्यात आले आहे. हे काम लोकसहभागातून करण्यात आले असून यासाठी आमदार हरिष पिंपळे व अन्य लोकप्रतिनिधींनी मोलाचे योगदान दिले आहे. माना परिक्षेत्रातील ठिकठिकाणी, महामार्गावरील झाडांवर पोलीस स्टेशन व संबंधितांचे मोबाइल नंबर स्टिकर स्वरूपात लावले. अमरावती परिक्षेत्रात जवळपास १५0 च्यावर पोलीस ठाणे येतात; मात्र परीविक्षाधीन पोलीस अधिकारी गोयल यांच्या कार्यकुशलतेमुळे माना पोलीस ठाण्याला ह्यआयएसओह्णचा पहिला मान मिळाल्याने गोयल यांनी याप्रकारे इतरांपुढे प्रेरक आदर्श ठेवला आहे.
माना पोलीस ठाण्याला मिळाले अमरावती विभागातील पहिले आंतरराष्ट्रीय मानांकन
By admin | Published: June 12, 2016 2:31 AM