लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका युवतीशी विवाह करून तिची फसवणूक करणार्या व त्यापूर्वी दोन विवाह करणार्या रामटेक येथील अट्टल बदमाशास खदान पोलिसांनी सोमवारी अटक केली. या इसमाने दोन विवाह आधीच झालेले असताना ते दडवून तिसरा विवाह केल्याचे तक्रारकर्त्या महिलेचे म्हणणे आहे.रामटेक येथील रहिवासी सचिन कल्याणसिंह सेंगर याने सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्याचे सांगून अकोल्यातील खदान परिसरातील रहिवासी असलेल्या ममता धरमसिंह ठाकूर यांच्याशी २८ एप्रिल २0१७ रोजी विवाह केला. सचिन सेंगर याने ममता हिला रायगड येथे नोकरीवर असल्याचेही सांगितले, विवाहानंतर सेंगर हा नागपूर येथील निवासस्थानीच राहत असल्याने ममता यांनी पतीला नोकरी संदर्भात विचारणा केली; मात्र त्याने नागपुरातील एका ऑटोमोबाईल कंपनीत असल्याचे सांगून विषय टाळला. त्यानंतर दिवाळीला सचिन सेंगर याचे गाव नागपूर जिल्हय़ातील इंदोरा येथे गेले असताना ममता या घराची साफसफाई करीत होत्या, यावेळी सचिन सेंगर याच्या पहिल्या लग्नाचे काही छायाचित्रे व घटस्फोटाचे दस्तावेज ममता ठाकूर यांना दिसले. त्यांनी पती सेंगरला विचारणा केली असता त्याने पहिल्या पत्नीला आजाराचे कारण सांगून घटस्फोट दिल्याचे ममता ठाकूर हिला सांगितला. हा वाद मिटविल्या जात नाही, तोच ममता ठाकूर यांच्या मोबाइल क्रमांकावर आणखी एका महिलेने फोन करून सचिन सेंगर याची दुसरी पत्नी असल्याचे सांगितले. एवढेच नव्हे तर सेंगरपासून एक अपत्यही असल्याचे ममता ठाकूर यांना मोबाइलवरील महिलेने सांगितले. या प्रकारानंतर फसवणूक झाल्याचे ममता ठाकूर यांच्या लक्षात आले. तिने सासरच्या मंडळींनी हा प्रकार सांगितला असता तिचे सासरे कल्याणसिंग सेंगर, सासू चंद्रकांता सेंगर, नणंद मनीषा, सरिता, दीपा व नीलिमा या सहा जणांनी ममता ठाकूर यांचाच छळ सुरू केला. ममता यांना मारहाण करीत शारीरिक व मानसिक छळ केला. हा छळ असहय़ झाल्यानंतर तसेच पतीची लबाडी लक्षात येताच त्यांनी पतीची कानउघाडणी करून खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली. खदान पोलिसांनी पती सचिन सेंगर, सासरे कल्याणसिंग सेंगर, सासू चंद्रकांता सेंगर, ननद मनीषा, सरिता, दीपा व नीलिमा या सहा जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आधी दोघींशी लग्न; तिसरीने बिंग फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 1:54 AM
खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका युवतीशी विवाह करून तिची फसवणूक करणार्या व त्यापूर्वी दोन विवाह करणार्या रामटेक येथील अट्टल बदमाशास खदान पोलिसांनी सोमवारी अटक केली. या इसमाने दोन विवाह आधीच झालेले असताना ते दडवून तिसरा विवाह केल्याचे तक्रारकर्त्या महिलेचे म्हणणे आहे.
ठळक मुद्देरामटेक येथील आरोपी जेरबंदअकोल्यातील मुलीची केली फसवणूक