लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे आणि त्यांच्या पथकाने वसंत टॉकीजनजीक गत तीन वर्षांपासून सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर मंगळवारी छापा टाकला. यावेळी जुगार अड्डा चालविणारा बोर्डे ऊर्फ भुऱ्यास वरली अड्ड्यावरून अटक केली असून, त्याच्याजवळून दोन हजार ६४० रुपये रोख जप्त करण्यात आली आहे.सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वसंत टॉकीजजवळ गत तीन वर्षांपासून छुप्या पद्धतीने हा वरली अड्डा सुरू असल्याने यावर पोलीस कारवाई झाली नाही; मात्र सदर वरली अड्ड्याची माहिती विशेष पथकाचे प्रमुख तथा सहायक पोलीस निरीक्षक हर्षराज अळसपुरे यांना मिळताच त्यांनी सदर अड्ड्यावर मंगळवारी छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी मालक राजेश गोविंद बोर्डे याला अटक केली आहे. त्याच्याजवळून दोन हजार ६४० रुपये रोख जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात केली. जुगार अड्डा चालविणारा मिश्रा गजाआडनिमवाडी परिसरात जुगार अड्डा चालविणारा मिश्रा नामक इसमाच्या जुगारावर विशेष पथकाने आतापर्यंत तीन वेळा कारवाई करून मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. तीनही वेळा मिश्रा फरार होण्यात यशस्वी झाला; मात्र त्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी जुगार अड्डा चालविणारा मिश्रा याला मंगळवारी अटक केली.
तीन वर्षांपासून चालत असलेल्या जुगारावर पहिला छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2017 1:24 AM