राजरत्न सिरसाट/अकोला: दशकभरात यावर्षी प्रथमच वेळेवर पावसाळा सुरू झाला असून, जून महिन्यातच अनेक ठिकाणी दीडपट पाऊस पडला आहे; पण पावसाचे स्वरू प असमान आहे. संपूर्ण पावसाळ्य़ात सरासरी जेवढा पाऊस पडतो, त्याच्या अर्धा पाऊस ४८ तासात पडण्याचे प्रमाण वाढल्याने पुढील महिन्यात पावसाचा खंड पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. १0 ते १२ जून रोजी पावसाने सुरुवात केली असून, राज्यात जून महिन्यामध्ये सरासरी २२३. ३ मिमी पाऊस झाला आहे. १९ जूनपर्यंत हा पाऊस १0६. ३ मिमी झाला आहे. म्हणजेच या महिन्याच्या सरासरीच्या ४६.६ टक्के पाऊस झाला आहे. राज्यातील जिल्हानिहाय पर्जन्यमानाची आकडेवारी बघितल्यास १९ जूनपर्यंत कोल्हापूर जिल्हय़ात २५ टक्के पाऊस झाला असून, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नाशिक, पुणे, सातारा उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा, गोंदिया व चंद्रपूर या १२ जिल्हय़ात २५ ते ५0 टक्के पाऊस झाला आहे. पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव,अहमदनगर, सोलापूर, सांगली, बीड, लातूर, नांदेड, परभणी, बुलडाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा व गडचिरोली या १७ जिल्हय़ात ५0 ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जालना, हिंगोली व वाशिम या तीन जिल्हय़ात ७५ ते १00 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे. औरंगाबाद जिल्हय़ात १00 टक्केपेक्षा अधिक पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला जिल्हय़ात दीडपट पाऊस झाला आहे; पण याच जिल्हय़ातील शेतकर्यांना अद्यापही चांगल्या पावसाची प्रतीक्षा आहे. पावसाअभावी शेतकर्यांची पेरणी खोळंबली आहे. अमरावती जिल्हय़ात २८५ मिमी पाऊस झाल्याने पेरणीसाठी शेतीला वाफसा येण्याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. राज्यात पावसाचे असे विषम स्वरू प आहे. काही ठिकाणी अतिवेगाने तर काही ठिकाणी रिमझिम पडणार्या या पावसामागे हवामान बदल कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
दशकभरात पहिल्यांदाच पावसाळा वेळेवर!
By admin | Published: June 24, 2015 1:35 AM