अकोला : यंदा पहिल्यांदाच रुबेला व गोवरचे दुहेरी लसीकरण होणार असून, विभागातील तब्बल २६ लाख ६९ हजार ४४५ मुलांना लस दिली जाईल. त्या अनुषंगाने विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यालयाला २३ लाख लस प्राप्त झाल्या आहेत.हवेतून पसरणाऱ्या संसर्गजन्य थेंबामुळे गोवरचा प्रादुर्भाव होतो. गोवर आणि रूबेला अतिशय संसर्गजन्य रोग आहे. त्याचा सर्वाधिक धोका १५ वर्षाखालील बालकांना आहे. त्यामुळे या मोहिमेंतर्गत ९ महिने पूर्ण केलेल्या तसेच १५ वर्षाखालील वयोगटावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने राज्यात सर्वत्र २७ नोव्हेंबरपासून गोवर आणि रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यंद पहिल्यांदाच रुबेला आणि गोवरचे दुहेरी लसीकरण करण्यात येत आहे हे विशेष. उपक्रमांतर्गत विभागातील २६ लाख ६९ हजार ४४५ बालकांना लस दिली जाईल. यामध्ये विभागातील पाचही जिल्ह्यातील सर्व शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय रुग्णालये, अंगणवाडी केंद्र, मदरसा आदि ठाकाणी लस दिली जाईल. यामध्ये एमआर, एमएमआरचे यापूर्वी लसीकरण झालेल्या तसेच लसीकरण झालेल्या बालकांचा समावेश असणार आहे. उपक्रमांतर्गत पालकांनी आपल्या पाल्यांचे लसीकरण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम.एम. राठोड यांनी केले आहे.भविष्यातील पिढी सशक्तरुबेला व गोवरच्या लसीकरणामुळे भविष्यातील पिढी सशक्त होईल.शिवाय, भविष्यात जन्माला येणाºया बालकांचे वजन व बौद्धीक क्षमता उत्तम राहण्यास मदत होईल. त्याची सुरुवात आतापासूनच या लसीकरणाद्वारे करा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.जिल्हानिहाय लसीकरणजिल्हा - बालकंअकोला - ३,१२,५१५अमरावती - ५,२३,३७२वाशिम - ३,११,१९१बुलडाणा - ७,७८,२५५यवतमाळ - ७,०८,१२३लसीकरणामुळे बालकांचा आजारांपासून बचाव होईल. शिवाय,भविष्यातील पिढीही आरोग्य दृष्ट्या सक्षम होईल. त्यामुळे नागरिकांनी आपल्या पाल्यांना रुबेला व गोवरचे लसीकरण करावे.- डॉ. व्ही. फारूकी, आरोग्य उपसंचालक, अकोला