आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. खाद्यतेल मार्केटमध्ये ग्राहकांकडून मागणी कमी आहे. त्यातच खाद्यतेलाची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे तेल डब्याचा दर कमी झाला आहे. सोयाबीन तेल डबा २,३५० ते २,४४० रुपयांपर्यंत मिळत आहे. तर शेंगदाणा तेल डबा २,३०० ते २,४००, सूर्यफूल डबा २,४५० ते २,६०० आणि पामतेल डबा १,९०० ते १,९५० रुपयांपर्यंत मिळू लागला आहे. आंब्याची आवक कमी झाली आहे. त्याचबरोबर डाळिंब, संत्रा, पेरुची काही प्रमाणात आवक होत आहे ; मात्र इतर फळांची आवक नाही. बाजार समितीत अनेक भाज्यांचे दर वाढले आहेत ; पण बटाट्याला अद्यापही दर कमी आहे. क्विंटलला १,४०० ते १,६०० रुपये दर मिळाला, तर दोडक्याला १० किलोला ५०० ते ५५० रुपये, गवारला ५०० ते ६०० रुपये दर १० किलोला मिळाला.
...........प्रतिक्रिया................
सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले होते ; पण सध्या मागणी कमी आणि आवक वाढल्याने दरात उतार आला आहे. तेलाच्या डब्यामागे घट आहे ; पण पाऊचचा दर कमी झाले नाहीत.
- संजय अढाव, ग्राहक
सध्या अनेक भाज्यांना चांगला दर मिळत आहे. त्याचबरोबर कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याने समाधान वाटते. बाजार समिती आठवडाभर सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे.
- विकास काकड, शेतकरी.