अकोला : महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या (फेस्कॉम) वतीने प्रथमच अकोल्यात आयोजित करण्यात आलेले विदर्भस्तरीय महिला अधिवेशन सोमवार, १५ डिसेंबर रोजी रामदासपेठेतील टिळक पार्कमध्ये उत्साहात पार पडले. या अधिवेशनात ज्येष्ठ महिलांना उद्भवणार्या विविध समस्या आणि त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या प्रगतीच्या विविध दिशांवर विचारमंथन करण्यात आले.दोन सत्रांमध्ये पार पडलेल्या विदर्भस्तरीय अधिवेशनाचा उद्घाटन सोहळा सकाळी १0 वाजता झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्ष डॉ. अलका व्यास, डॉ. आशा मिरगे, डॉ. दीपाली शुक्ल उपस्थित होत्या. अधिवेशनात अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलडाणा या जिलंतील २२५ ज्येष्ठ महिला सहभागी झाल्या होत्या. पहिल्या सत्राच्या अध्यक्षस्थानी शकुन परांजपे होत्या. डॉ. आशा मिरगे, डॉ. दीपाली शुक्ल व डॉ. अलका व्यास यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ महिलांना उद्भवणार्या विविध समस्यांवर यावेळी विचारमंथन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन झाले. संचालन डॉ. स्मिता कायंदे व प्रास्ताविक पूनम पिंपरकर यांनी केले. दुसर्या सत्राच्या अध्यक्षस्थानी मंगला देशमुख होत्या. या सत्रात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि निबंध स्पर्धा पार पडली तसेच कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत ज्येष्ठ महिलांसाठी प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम घेण्यात आला. यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणार्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार व पारितोषिके वितरित करण्यात आली. संचालन संध्या संगवई यांनी केले. आभार शुभांगी कुळकर्णी यांनी मानले. कार्यक्रमाला आयस्कॉनचे उपाध्यक्ष ना. ना. इंगे, विदर्भ पश्चिम विभागाचे अध्यक्ष मधुसूदन कुळकर्णी, उपाध्यक्ष परशराम जाधव, सचिव विनायक पांडे, समन्वय समितीचे अध्यक्ष अरविंद मोडक, कोशाध्यक्ष दिनकर चिपळूणकर, सचिव मु. ज. निर्वाण, प्रकाश पिंपरकर, सविता गौतम, मंगला देशमुख, शुद्धमती इंगळे, कलावती तळेकर आदी उपस्थित होते.
अकोला येथे पहिले विदर्भस्तरीय महिला अधिवेशन उत्साहात
By admin | Published: December 16, 2014 12:59 AM