कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी गत मार्च २०२० पासून ‘लाॅकडाऊन’ लागू करण्यात आले होते. त्यानंतर राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आल्याने राज्यातील मत्स्य आणि या व्यवसायात काम करणाऱ्या कामगार संकटात सापडले असून, हाताला काम नसल्याने त्यांच्यावर बेरोजगारी आणि उपासमारीची वेळ आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या राज्यातील मत्स्य व्यवसाय व त्यामध्ये काम करणाऱ्या कामगारांना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी बहुजन जनता दलाचे संस्थापक अध्यक्ष पंडित दाभाडे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री आणि मत्स्य व्यवसाय राज्यमंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली. संबंधित मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांना सादर करण्यात आले. यावेळी बहुजन जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संतोष गवई, विलास मोरे, अंकुश पवारे, संभाजी गायकवाड, राजेंद्र पाटील, सुभाष सुरवाडे, हिंमत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
मत्स्य व्यवसाय, कामगारांना आर्थिक मदत द्यावी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2021 4:14 AM