अतुल जयस्वालअकोला, दि. १२- थकीत देयकांमुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या उच्च व लघू दाब वीज ग्राहकांच्या थकबाकीमुक्तीसाठी महावितरणने १ नोव्हेंबर २0१६ पासून ह्यनवप्रकाशह्ण योजना सुरू केली आहे. योजना सुरू झाल्यापासून फेब्रुवारी अखेरपर्यंत महावितरणच्या अकोला परिमंडळातील अकोला व वाशिम या जिल्हय़ांमधील ५,४६१ वीज ग्राहकांनी या योजनेंतर्गत १ कोटी ३६ लाख ३५ हजार ५0३ रुपयांची मूळ थकबाकी भरून वीज पुरवठा पूर्ववत करून घेतला आहे.नवप्रकाश योजनेचा कालावधी सहा महिन्यांचा असून, योजनेच्या पहिल्या तीन महिन्यांत मूळ थकबाकीचा भरणा करणार्या वीज ग्राहकांना व्याज व विलंब आकाराची रक्कम १00 टक्के माफ करण्यात आली. आता या योजनेला जुलै २0१७ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यांत मूळ थकबाकी आणि २५ टक्के व्याजाची रक्कम भरणा केल्यास ७५ टक्के व्याज व विलंब आकाराची १00 टक्के रक्कम माफ होणार आहे. या योजनेत थकबाकीची मूळ रक्कम भरणार्या ग्राहकांना सुरक्षा ठेव, सर्व्हिस कनेक्शन चार्जेस, रिकनेक्शन चार्जेसमध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली असून, ग्राहकांना कोणत्याही प्रतिज्ञापत्राची गरज नाही. शिवाय, वीज जोडणीचा अर्ज ग्राहकांना कार्यालयात मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे ही योजना म्हणजे थकबाकीदार ग्राहकांसाठी सवलतींचा पाऊसच ठरत आहे. या योजनेचा फायदा घेत फेब्रुवारी अखेरपर्यंत अकोला व वाशिम या जिल्हय़ांमधील कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या ५,४६१ ग्राहकांनी वीज पुरवठा पूर्ववत करून घेतला आहे. यासाठी त्यांनी १ कोटी ३६ लाख ३५ हजार ५0३ रुपयांची मूळ थकबाकी भरली आहे. या योजनेतून थकबाकीमुक्त झालेल्या वीज ग्राहकांना महावितरणकडून उद्योग चालू करण्याच्या प्रोत्साहनांतर्गत त्यांच्या मागणीनुसार त्वरित नवीन वीज जोडणी देण्यात येणार आहे. तिन्ही मंडळातील विभागनिहाय आकडेवारीविभाग ग्राहक थकबाकीचा भरणाअकोला ग्रामीण ६७२ १९ लाख ६४ हजार २७0अकोला शहर २७७ १६ लाख ६९ हजार ७४0अकोट ३७९ १४ लाख १७ हजार ५१0बुलडाणा १५६५ २५ लाख ३५ हजार १२0खामगाव ९३६ १९ लाख ८५ हजार २२५मलकापूर ९४६ २१ लाख २८ हजार ६१३वाशिम ६८७ १९ लाख ३५ हजार ५0३------------------------------------------------------------एकूण ५,४६१ १ कोटी ३६ लाख ३५ हजार ५0३
साडेपाच हजार वीज ग्राहकांनी घेतला ‘नवप्रकाश’चा आधार!
By admin | Published: March 13, 2017 2:43 AM