अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, शनिवार १९ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील आणखी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा २०८ वर गेला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १४६ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ६४२१ झाली आहे. दरम्यान, शनिवारी आणखी २० जणांना डिस्चार्ज देण्यात आलाशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून शनिवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ३८१ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १४६ अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित २३५ अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह निदान झालेल्या रुग्णांमध्ये ५४ महिला व ९२ पुरुषांचा समावेश आहे. यामध्ये मुर्तिजापूर येथील २५ जणांसह, पातूर येथील १५ , पिंगळा येथील १०, डाबकी रोड येथील सहा, चान्नी ता. पातूर, लहान उमरी व जीएमसी येथील प्रत्येकी पाच, मोठी उमरी, सिंधी कॅम्प व जठारपेठ येथील चार, गीता नगर, बार्शिटाकळी, हरिहर पेठ, सिरसो, गुसरवाडी, मलकापूर रोड येथील प्रत्येकी तीन, गौरक्षण रोड, मलकापूर, जवाहर नगर, रामदासपेठ, तेल्हारा, तोष्णीवाल लेआऊट, जूने शहर येथील प्रत्येकी दोन, कुरुम, रामदास प्लॉट, खेमका सदन जि.प., दिग्रस बु., पीकेव्ही, खामखेड ता.पातूर, शिर्ला ता.पातूर, अकोट फैल, काटेपूर्णा, अकोट, कान्हेरी सरप, कौलखेड, बाजोरिया लेआऊट, बाळापूर, चोहट्टा बाजार, खदान, रमापूर, आगर, दुर्गा चौक, ब्लॅड बॅक जवळ, कॅलेक्टर कॉलनी, मानिक टॉकीज मागे, बाळापूर रोड, दुर्गा नगर, तापडीया नगर व मोबिला नगर येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. सायंकाळी मुर्तिजापूर, जीएमसी, गंगानगर, जीएमसी क्वॉर्टर व रणपिसे नगर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.चार पुरुष, एक महिलेचा मृत्यूशनिवारी आणखी पाच रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये रामदासपेठ, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष, बार्शिटाकळी येथील ७४ वर्षीय पुरुष, खामखेड, अकोला येथील ५७ वर्षीय पुरुष, गंगानगर येथील ६६ वर्षीय पुरुष व सरस्वती अपार्टमेंट, सिव्हिल लाईन येथील ६५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे.१५२१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६४२१ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ४६९२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत २०८ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १५२१ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.२० जणांना डिस्चार्जशनिवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून २० जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
दिवसभरात पाच जणांचा मृत्यू; १४६ नवे पॉझिटिव्ह, २० कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2020 6:24 PM