सायंकाळी जीएमसी येथील चार, बाळापूर व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन, शिवर, एमआयडीसी, दुर्गा चौक, रेणुका नगर, गुलजार घाट, घुसर, आपातापा, गुन्हे अन्वेषक विभाग, सस्ती वाडेगाव, विजय नगर, रामदास पेठ, खडकी व शिवनी येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
एक महिला, चार पुरुष दगावले
कोरोनावर उपचार सुरु असलेल्या मुंडगाव, ता. अकोट येथील ८६ वर्षीय महिला, डाबकी रोड, अकोला येथील ७१ वर्षीय पुरुष, तारफैल, अकोला येथील ६४ वर्षीय पुरुष, शिवापूर अकोला येथील ५० वर्षीय पुरुष गोरक्षण रोड, अकोला येथील ८३ वर्षीय पुरुष अशा पाच जणांचा गुरुवारी मृत्यू झाला.
६९८ जणांना डिस्चार्ज
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ३३, युनिक हॉस्पिटल येथील सात, हॉटेल रिजेन्सी येथील चार, नवजीवन हॉस्पिटल येथील चार, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील दोन, बिहाडे हॉस्पिटल येथील सात, आयकॉन हॉस्पिटल येथील दोन, हारमोनी हॉस्पिटल येथील दोन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील पाच, आयुर्वेदिक महाविद्यालयातून दोन, कोविड केअर सेंटर अकोट येथील चार, इंद्रा हॉस्पिटल येथील तीन, हॉटेल स्कायलार्क येथील तीन, तर होम आयसोलेशन येथील ६२० अशा एकूण ६९८ जणांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला.
५,३३९ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७,९५८ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल २२,१६१ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४५४ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ५,३३९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.