शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

४८ तासांत पाचजणांचा मृत्यू, २४४ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:18 AM

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवार (दि. २९) व मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६४२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ...

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून सोमवार (दि. २९) व मंगळवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ६४२ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ११७ जण पॉझिटिव्ह आढळून आले; तर उर्वरित ५२५ जण निगेटिव्ह आहेत. गत दोन दिवसांत १९०२ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये १२७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले.

दोन महिला, तीन पुरुषांचा मृत्यू

कोरोनावर उपचार घेत असलेल्या वाशिम बायपास, अकोला येथील ६५ वर्षीय पुरुष रुग्णाचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. रामदास पेठ, अकोला येथील ६८ वर्षीय पुरुष, मनोरथ कॉलनी डाबकी रोड, अकोला येथील ४५ वर्षीय महिला व मोठी उमरी येथील २७ वर्षीय महिला अशा तीन रुग्णांचा मंगळवारी सायंकाळी मृत्यू झाला. सोमवारी लहान उमरी, अकोला येथील ७२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

४१४ जणांना डिस्चार्ज

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ७०, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथील दोन, आयकॉन हॉस्पिटल येथील चार, उम्मत हॉस्पिटल सोनोरी येथील चार, युनिक हॉस्पिटल येथील चार, बिहाडे हॉस्पिटल येथील पाच, यकीन हॉस्पिटल येथील एक, हारमोनी हॉस्पिटल येथील तीन, सूर्यचंद्र हॉस्पिटल येथील दोन, नवजीवन हॉस्पिटल येथील नऊ, ओझोन हॉस्पिटल येथील चार, आयुर्वेदिक महाविद्यालयातून सहा, कोविड केअर सेंटर अकोट येथील पाच, हॉटेल रिजेन्सी येथील पाच, अकोला ॲक्सिडेंट येथील एक, हॉटेल स्कायलार्क येथील एक, इंद्रा हॉस्पिटल येथील दोन, तर होम आयसोलेशन येथील २८६ अशा एकूण ४१४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

६,३१९ ॲक्टिव्ह रुग्ण

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २७,४४४ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यांपैकी तब्बल २०,६७४ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४५१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ६,३१९ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

सोमवारी या भागात आढळले रुग्ण

रामदास पेठ येथील सात, जठारपेठ व अकोट येथील प्रत्येकी पाच, कौलखेड, वाशिम बायपास, मोठी उमरी, आसरामाता कॉलनी येथील प्रत्येकी तीन, राधाकिसनसमोर, बार्शी टाकळी, वसंत टॉकीज, शास्त्रीनगर, तापडियानगर व तेल्हारा येथील प्रत्येकी दोन, जुने शहर, बाबूळगाव, हनुमाननगर, सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन, जामनेर, गोरक्षण रोड, नयागाव, आळसी प्लॉट, हिंगणा रोड, येवलखेड, ज्योतीनगर, खडकी, बाळापूर नाका, बिर्लाराम मंदिर, तळेगाव बाजार, शिवर, पंचशीलनगर, जीएमसी, सिंधी कॅम्प, राऊतवाडी, पातूर, वणी रंभापूर, बाळापूर, लहरियानगर, सिंधखेड मोरेश्वर, बोरगाव मंजू व हरिहरपेठ येथील प्रत्येकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

मंगळवारी या भागात आढळले रुग्ण

बार्शीटाकळी येथील चार, मूर्तिजापूर, मोठी उमरी व अकोट येथील प्रत्येकी तीन, शास्त्रीनगर, मलकापूर, कौलखेड, रणपिसेनगर, महान, सिंधी कॅम्प व पारस येथील प्रत्येकी दोन, वाडेगाव, रामधन प्लॉट, हिंगणा रोड, उगवा, डाबकी रोड, सहकारनगर, खडकी, तुकाराम चौक, आदर्श कॉलनी, जीएमसी, गीतानगर, शेलू बोंडे, रुद्रायणी, पातूर, पत्रकार कॉलनी, तेल्हारा, बेलुरा, रामदासपेठ, वाशिम बायपास, कॉंग्रेस नगर, हिवरा व निंबा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.