शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
2
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
3
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
4
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
5
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
6
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
7
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
8
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
9
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
10
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
11
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
12
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
13
अखेर अनिरुद्ध-संजनाला घराबाहेर काढणार अरुंधती! 'आई कुठे काय करते'च्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज
14
महाराष्ट्राच्या निकालाचा भविष्यातील राष्ट्रीय राजकारणावर परिणाम, 'या' 5 पॉइंटमधून समजून घ्या...
15
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
16
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
17
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
18
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
19
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
20
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...

राष्ट्रीय महामार्गावरील नेहरू पार्क ते बाळापूर नाका डांबरीकरणाला निधीअभावी पाच मीटरची कात्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 1:26 AM

अकोला : केवळ चाळीस लाख रुपयांअभावी नेहरू पार्क ते बाळापूर नाका मिनी बायपास या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाला सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच ते तीन मीटरची साइड कात्री लावली आहे. सव्वाचार किलोमीटरच्या या अंतरात दोन्ही बाजूने डांबरीकरणाची रुंदी कापल्या गेली आहे.

ठळक मुद्देकेवळ ४० लाखांसाठी सव्वाचार किलोमीटरच्या मार्गांच्या दोन्ही कडा सुटल्या अर्धवट

संजय खांडेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : केवळ चाळीस लाख रुपयांअभावी नेहरू पार्क ते बाळापूर नाका मिनी बायपास या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाला सार्वजनिक बांधकाम विभागाने पाच ते तीन मीटरची साइड कात्री लावली आहे. सव्वाचार किलोमीटरच्या या अंतरात दोन्ही बाजूने डांबरीकरणाची रुंदी कापल्या गेली आहे.नेहरू पार्क चौक ते बाळापूर नाका या दरम्यान राष्ट्रीय महामार्गाचे (४.२००) सव्वाचार किलोमीटर अंतराचे डांबरीकरण २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय निधीतून गेल्या पंधरवाडयात करण्यात आले.  या डांबरीकरणाच्या कामासाठी २ कोटी ८६ लाख ९० हजार ४९६ रुपयांची मंजुरी देण्यात आली. बारा ते नऊ मीटर रुंद असलेल्या या मार्गाचे केवळ सात मीटर रुंदीकरण झाल्याने अनेक ठिकाणी पाच मीटर, तर काही ठिकाणी तीन मीटर रस्त्याचे डांबरीकरण करता आले नाही. त्यामुळे सर्वसामान्य अकोलेकर बुचकळ्यात पडले आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता, या मार्गाच्या दुहेरी रुंदीच्या डांबरीकरणासाठी अंदाजपत्रकातच सात मीटर नोंद आहे. वास्तविक पाहता मार्गाची रुंदी नऊ ते बारा मीटर असताना, सार्वजनिक बांधकाम विभागाने सात मीटरचे अंदाजपत्रक का काढले, यावर शंका उपस्थित होत आहे. कात्री लागलेल्या मार्गाच्या डांबरीकरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे ४० लाखांची अतिरिक्त तरतूद नसल्याने ही विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.

अंदाजपत्रकानुसारच सात मीटर अंतराप्रमाणे दुहेरी मार्गाचे डांबरीकरण झाले आहे. २० एमएम जाडीचे कारपेट आणि सहा एमएमचे सीलकोट गुणवत्तेनुसार आहे. पूर्ण रुंदीच्या डांबरीकरणासाठी ३८ ते ४० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी लागला असता; मात्र तशी तरतूद नसल्याने रुंदी कमी दिसत आहे.-मिथिलेश चव्हाण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अकोला.

मार्गाच्या वास्तविक रुंदीप्रमाणे जर डांबरीकरण केले असते, तर दीड किलोमीटर डांबरीकरण करता आले नसते. या मार्गावरील दोन्ही बाजंूची शोल्डर साइड सुटली आहे. त्यामुळे कंत्राटदारावर कारवाई करणे उचित होणार नाही.- श्रीराम पटोकार, उपविभागीय अभियंता, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6