येथील पाच जणांचा मृत्यू
वरखेड (ता. बार्शीटाकळी) येथील ७० वर्षीय पुरुष
सेलगाव (ता. पातूर येथील) ६५ वर्षीय पुरुष
आंबोडा (ता. अकोट) येथील ८० वर्षीय पुरुष
मलकापूर येथील ७० वर्षीय पुरुष
देहगाव (ता.बाळापूर) येथील ७२ वर्षीय पुरुष
रॅपिड चाचण्यांमध्ये १९२ पॉझिटिव्ह
शनिवारी दिवसभरात १६०९ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये १९२ पॉझिटिव्ह आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात ९२,२२९ चाचण्या झाल्या. त्यामध्ये पैकी ७१६० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
२७६ कोरोनामुक्त
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ५१, आरकेटी कॉलेज येथून तीन, नवजीवन हॉस्पिटल येथून एक, अकोट कोविड केअर सेंटर येथून चार, युनिक हॉस्पिटल येथून तीन, अवघाते हॉस्पिटल मूर्तिजापूर येथून एक, यकिन हॉस्पिटल येथून एक, समित्र हॉस्पिटल येथून एक, जिल्हा स्त्री रुग्णालयातून पाच, हॉटेल रिजेन्सी येथून सहा, बिहाडे हॉस्पिटल येथून आठ, अकोला ॲक्सिडेंट हॉस्पिटल येथून चार तर होम आयसोलेशनमधील १८८ अशा एकूण २७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
४,६१६ रुग्ण उपचाराधीन
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३,८६३ जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी तब्बल २८,६८७ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ५६० जणांचा मृत्यू झाला असून सद्यस्थितीत ४,६१६ रुग्ण उपचाराधीन आहेत.