तेल्हारा (जि. अकोला) : डिसेंबर २0१६ मध्ये मुदत संपणार्या अकोला जिल्ह्यातील ५ नगरपरिषदांच्या प्रभाग रचना व आरक्षण सोडत २ जुलैला निघणार आहे. नगरपरिषदांची नव्याने झालेली प्रभाग रचना व प्रभागामधील जागांची आरक्षण सोड २ जुलैला निघणार आहे. जिल्ह्यातील बाळापूर नगरपरिषदेची प्रभाग रचना व आरक्षण सोडत २ जुलैला सकाळी ११ वाजता निघणार असून सभेचे नियंत्रण अधिकारी उपविभागीय अधिकारी बाळापूर हे राहतील. मूर्तिजापूर नगरपरिषद आरक्षण सोडत २ जुलैला सकाळी ११ वाजता निघणार असून सभेचे नियंत्रण अधिकारी उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर हे राहतील. पातूर नगरपरिद आरक्षण सोडत २ जुलैला सकाळी ११ वाजता निघणार असून सभेचे नियंत्रण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (महसूल) राहतील. आकोट नगरपरिषद आरक्षण सोडत २ जुलैला दुपारी ४ वाजता निघणार असून सभेचे नियंत्रण अधिकारी म्हणून उपविभागय अधिकारी आकोट राहतील व तेल्हारा नगरपरिषदेची आरक्षण सोडत २ जुलैला दुपारी ४ वाजता निघणार असून सभेचे नियंत्रण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) राहतील. प्रभाग रचना व आरक्षण सोडतीमध्ये अनेक इच्छुक उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार असून अनेकांना दुसरा प्रभाग शोधावा लागू शकतो.
पाच नगर परिषदांची आरक्षण सोडत २ जुलैला
By admin | Published: June 30, 2016 1:47 AM