दुसऱ्या रुग्णाच्या संपर्कातील नातेवाइकांचा शोध लागेना
अकोल्यात पाहूणे म्हणून आलेल्या नागपुरातील दोन रुग्णांपैकी एका रुग्णाच्या नातेवाइकांचा शोध लागला आहे; परंतु अद्यापही दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कातील नातेवाइकांचा शोध लागला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या नातेवाइकांचा शोध घेणे सुरू आहे.
तर पाचही रुग्णांचे पुन्हा स्वॅब घेणार
नागपुरातील त्या रुग्णाचे नमुने पुण्याला पाठविण्यात आले आहेत. यामध्ये त्या रुग्णाला कोविडचा नवा स्ट्रेन आढळल्यास अकोल्यातील संपर्कात आलेल्या पाचही रुग्णाचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात येणार आहेत.
इंग्लंड प्रवासाची पार्श्वभूमी असलेल्या नागपुरातील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अकोल्यातील त्याच्या नातेवाइकांवर आरोग्य विभाग लक्ष देऊन आहे. नागपुरातील रुग्णाच्या तपासणी अहवालाची प्रतीक्षा असून, त्यानंतरच पुढील निर्णय घेता येईल. विदेशातून आलेल्या नागरिकांनी स्वत:ला होम आयसोलेशनमध्ये ठेवावे, लक्षणे दिसताच त्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक,अकोला.