पिंजर: येथून जवळ असलेल्या निहिदा येथे एका घरावर अचानक विज कोसळून पाच महिला जखमी झाल्या. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. यातील दोन महिलांची प्रकृती गंभीर असून, त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रूग्णालयात हलविण्यात आले.पिंजर परिसरात गत काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास परिसरात विजेच्या कडकडटांसह पाऊस सुरू झाला. पाऊस सुरू असतानाच, निहिदा येथे कडकडाटून एका घरावर विज कोसळली. याठिकाणी अशोक वानखडे यांच्या दशक्रियेचा कार्यक्रम सुरू होता. घरामध्ये काही महिला बसलेल्या होत्या. विज कोसळल्यानंतर घरातील सुलोचना रामदास महल्ले(४३), प्रमिला बाळु महल्ले(४५), मंगला राजु घुमरे(४३) आणि वर्षा विनोद वानखडे(२५, शांताबाई उत्तम महल्ले(५0) या महिला भाजल्या. यातील सुलोचना महल्ले व प्रमिला महल्ले यांना उपचारासाठी अकोल्यातील सर्वोपचार रूग्णालयात दाखल करण्यात आले. या घरामधील इलेक्ट्रीक उपकरणे सुद्धा जळाली असून, घर क्षतिग्रस्त झाले आहे. जखमींपैकी मंगला घुमरे, वर्षा वानखडे, शांताबाई महल्ले यांच्या पिंजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. (वार्ताहर)