शहरातील दक्षता नगर ते एनसीसी कार्यालयादरम्यान उड्डाणपूल तयार होत असून यामध्ये नागपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या भागात एक रॅम्प तर दुसरा रॅम्प बाळापूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलावर बांधला जात आहे. सदरचे बांधकाम मंजूर नकाशाप्रमाणे हाेत नसून दोन्ही बाजूकडील रॅम्पची जागा कमी केल्यामुळे कमी जागेत उड्डाणपुलाचे निर्माण कसे होणार, असा सवाल उपस्थित करीत भविष्यात या ठिकाणी वाहतुकीची काेंडी हाेणार असल्याचे कृती समितीने आयाेजित पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने सदरचे बांधकाम तातडीने बंद करून त्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी आळशी प्लाट उड्डाणपूल विरोधी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. नागरिकांच्या आक्षेपानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी परिसरात भेट देऊन या दोन्ही रॅम्पच्या कामाची पाहणी केली असता दोन्ही कडेची जागा कमी झाली असल्याची कबुली दिली हाेती. त्यानंतरही बांधकाम सुरूच असल्यामुळे कृती समितीच्यावतीने धरणे आंदाेलन छेडण्यात आले. यावेळी कृती समितीचे द्वारकादास चांडक,
सुनील अजमेरा, राजेश चांडक, राधेश्याम चांडक, कपिल बाजोरिया, सुधा सोलंकी, किरण चांडक, मधुबाला अजमेरा, आरती अग्रवाल, राजू सावना, राजेश राठी, उमेश शुक्ला, राहुल अजमेरा, रितेश सोलंकी, बी. एस. देशमुख, गौरव जोशी, प्रवीण अग्रवाल, प्रमोद नाईक, देविदास सतनानी, डॉ. जगदीश खंडेतोड, डॉ. चंदन मोटवाणी, अनुज अग्रवाल, रूपेश पलसानिया, नरेश अग्रवाल, अरुणा अग्रवाल, शोभा चोमवाल, संतोष अग्रवाल, विनोद मोटवानी, रमण मानधने, सनी वाधवानी, सुधाकर छबिले, पुरुषोत्तम चांडक, प्रेमा चांडक, चंद्रकांत अन्नदाते, शोभा अन्नदाते, आरती अन्नदाते, पूजा अन्नदाते, लता धोत्रे, सुनील धोत्रे आदी उपस्थित होते.