ब्रम्हानंद जाधव/मेहकर (बुलडाणा):पश्चिम वर्हाडात अपुर्या पावसामुळे दुष्काळाचे सावट गडद झाले आहे. पाणी व चार्याची टंचाई आतापासूनच जाणवत असल्याने जनावरांचा चारा महागला आहे. दुष्काळाच्या या फटक्यामुळे जनावरांचे बेहाल होत आहेत. पश्चिम वर्हाडातील बुलडाणा, अकोला व वाशिम जिल्ह्यात गतवर्षी गारपिट व अवकाळी पाऊस झाल्याने, शेतकर्यांनी शेतात साठवून ठेवलेल्या चार्याची नासाडी झाली होती. शेतात असलेल्या सोयाबीन व इतर कुटाराला बुरशी लागून, ते कुटारही खराब झाले होते. यंदाच्या पावसाळ्यात अपुरा पाऊस पडल्याने पश्चिम वर्हाडावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या दुष्काळाचा फटका आता मुक्या जनावरांनाही बसू लागला आहे. शेतकर्यांकडे चारा उपलब्ध नसल्याने जनावरांची रानोमाळ भटकंती सुरू झाली असून, पशुधन वाचविण्यासाठी शेतकर्यांची तारांबळ उडत आहे. अकोला जिल्ह्यात २ लाख ७७ हजार ८८१, वाशिम जिल्ह्यात ३ लाख ४ हजार ३४७ तर बुलडाणा जिल्ह्यात १0 लाख १३ हजार ६८८ जनावरे आहेत. मोठय़ा जनावराला सुमारे ७ किलो, तर छोट्या जनावराला ३ किलो कोरडा चारा दिवसाकाठी लागतो. पश्चिम वर्हाडातील पशुपालकांनी साठवून ठेवलेला चारा संपल्याने इतर जिल्ह्यांतून चारा खरेदी केला जात आहे. या चार टंचाईचा गैरफायदा घेत ज्याच्याकडे थोड्या बहुत प्रमाणात चारा शिल्लक आहे; त्यांनी चार्याच्या किंमती वाढवून ठेवल्या आहेत. परिणामी, अनेक पशुपालकांनी त्यांची जनावरे विक्रीस काढली आहेत.
चारा महागला, मुक्या जिवांचे बेहाल!
By admin | Published: January 26, 2015 12:42 AM