उरळ ठाणेदार यांनी हातरुण येथे भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे. हात धुणे, सॅनिटायझरचा वापर, शारीरिक अंतर राखणे आणि मास्कचा वापर नियमित करणे आवश्यक व महत्त्वाचे आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल. कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. कोरोनाला ब्रेक करण्याची गरज निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोना प्रतिबंधक लस नागरिकांनी घ्यावी, असे आवाहन उरळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांनी केले आहे.
यावेळी सरपंच वाजिद खान, माजी सरपंचपती एजाज खान, माजी सरपंचपती नजाकत खान, हकिमोद्दीनभाई, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष नासीर खान, ग्रामपंचायत सदस्य शे. युसूफ, साबीरभाई, मंजूर शाह, शैलेश घुगे, हातरुण पोलीस चौकीचे विजय झाकर्डे, पोलीस नायक रघुनाथ नेमाडे, मुमताज खान, शे.कासमभाई, अलियार खान, पत्रकार रिझवान खान, सामाजिक कार्यकर्ते गजानन नसुर्डे, पत्रकार संतोष गव्हाळे, साजिद शाह हजर होते.