काेराेनाची साखळी ताेडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यामुळे सारे व्यवसाय ठप्प पडले आहेत. जीवनाश्यक वस्तूंच्या विक्रीसाठी सकाळी ७ ते ११ ही वेळ असली तरी अवघ्या चार तासात उसळणारी गर्दी पाहता काेराेनाची साखळी ताेडण्याचा उद्देश सफल हाेत आहे असे वाटत नाही त्यामुळे कडक निर्बंधांमधून सवलत द्यावी, आम्ही काेराेना नियम पाळण्याची हमी देताे फक्त आम्हाला आमच्या हक्काचा व्यवसाय करू द्या अन्यथा सारेच अर्थच्रक काेलमडेल अशा शब्दात अकाेल्यातील व्यापाऱ्यांनी आपल्या भावना लाेकमत फाेरमच्या माध्यमातून शासनाकडे व्यक्त केल्या आहेत.
अकाेला : अकाेला जिल्ह्यात काेराेनाचा उद्रेक झाल्यामुळे शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. यामुळे अकाेल्यातील सर्व बाजारपेठ ठप्प पडली आहे. या बाजारपेठेच्या भरवशावर लाखाेंचा उदरनिर्वाह चालताे, अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. आता सारेच ठप्प असल्याने अनेकांचा राेजगार गेला आहे. त्यामुळे शहरातील व्यापारी वर्ग हवालदिल झाला आहे. काेराेनाचे संकट संपता संपत नाही , येणाऱ्या काळात काेराेनासाेबतच राहावे लागेल अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काेराेना प्रतिबंधक नियम पाळण्याची सक्ती करावी, व्यापारी ते नियम काटेकाेर पाळतील अशी ग्वाही देत व्यापाऱ्यांनी बाजारपेठ खुली करण्याची मागणी लाेकमत फाेरमच्या माध्यमातून गुरूवारी केली. शहरातील अर्थचक्र सुरळीत झाले पाहिजे यासाठी व्यापाऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी लाेकमतने गुरूवारी ऑनलाईन सभेचे आयाेजन केले हाेते. या सभेला शहरातील व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल दाेन तास चाललेल्या या चर्चेत सर्वच व्यावसायिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
काेट..
व्यापाऱ्यांनी सरकारचे प्रतिनिधी म्हणूनच काम केलेले आहे. पहिल्या व दुसऱ्या लाॅकडाऊनमध्ये सरकारला सर्वताेपरी सहकार्य केले आहे. त्यामुळे आता सरकारनेही संवेदनशीलपणे विचार केला पाहिजे. आम्हाला अनुदान नकाेच आहे मात्र नियम पाळून व्यापार करण्याची परवानगी देण्यात यावी. व्यापाऱ्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांचा राेजगार टिकवून ठेवला आहे त्यांना मदतच केली आहे हे माेठे सामाजिक काम आहे त्यामुळे आम्हाला सरकारने मदत करावी अशी आमची भूमिका नाही मात्र आम्ही गेल्या दहा वर्षात सरकारकडे भरलेल्या इन्कमटॅक्स पैकी २५ टक्के रक्कम आम्हाला बिनव्याजी वापरण्यास द्यावी. सरकार ठरवेल त्या मुदतीत सदर रक्कम परत केली जाईल. सरकारने याबाबत सकारात्मक विचार केला तर अर्थचक्र अधिक गतिमान हाेईल.
संताेष मंडलेचा, अध्यक्ष महाराष्ट्र चेंबर ऑफ कामर्स
काेट...
काेराेना लाॅकडाऊनमध्ये व्यापाऱ्यांनी नुकसान सहन केले आहे. प्रत्येकाच्या व्यापारावर अवलंबून असलेल्यांचा राेजगारही सांभाळला आहे. मात्र व्यापाऱ्यांच्याही सहनशीलतेला मर्यादा आहेत हे सरकारने लक्षात घ्यावे. लाॅकडाऊन हा पर्याय नाही त्यामुळे काेराेना नियमाचे पालन करून बाजारपेठ खुली केली पाहिजे. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन बाजारपेठेची वेळ पूर्ववत करणे गरजेचे आहे अन्यथा सर्व अर्थव्यवस्था धाेक्यात येईल. मी चेंबरच्या माध्यमातून ही भूमिका सातत्याने केंद्र व राज्य सरकारपर्यंत पाेहोचवत आहे.
नितीन खंडेलवाल, अध्यक्ष विदर्भ चेंबर ऑफ काॅमर्स
.........................
व्यापारी नुकसान सहन करतील परंतु त्याला एक सीमा आहे, दाेन वर्ष झाली व्यापार रूळावर आलेला नाही. त्यामुळे या व्यापारावर अवलंबून असलेल्या कामगारांची स्थिती अतिशय बिकट झाली आहे याचाही विचार आता सरकार करणार आहे की नाही?
निकेश गुप्ता
....................
बांधकाम क्षेत्रावर बंधने आहेत, त्यामुळे काम ठप्प आहे. दुसरीकडे आम्ही घेतलेल्या कर्जावर व्याज सुरूच आहे, सरकारचा टॅक्सही चालूच आहे त्यामध्ये कुठलीही सवलत नाही अशा स्थितीत व्यावसायिक किती दिवस तग धरू शकतील? आता बाजारपेठ खुली केली पाहिजे.
पंकज काेठारी
..............................
विवाह सेवा संघर्ष समितीमध्ये ८५ सेवा येतात. एक विवाह पार पडला म्हणजे या सर्व सेवा क्षेत्राला राेजगार मिळताे. गेल्या दाेन वर्षापासून लग्न साेहळे ठप्प आहेत. २५ लाेकांच्या मर्यादेमध्ये साेहळे हाेतात त्यामुळे लाखाे लाेकांचा राेजगार गेला आहे. लग्न साेहळ्यांमुळे काेराेना वाढताे असा अजब शाेध प्रशासनाने लावला आहे. गेल्या दाेन वर्षात लग्न साेहळ्यांवरच बंधने आहेत मग काेराेना कमी झाला का? आता तरी सरकारने किमान मंगल कार्यालयांच्या क्षमतेच्या अर्ध्या क्षमतेत लग्न साेहळे सुरू करण्याची परवानगी द्यावी
संजय शर्मा
........................
लाॅकडाऊनचे काेणतेही निकष नाहीत, केवळ एका दिवसाच्या सूचनेवरून लाॅकडाऊन लावण्याची घाेषणा केली जाते. त्यामुळे काेणालाच नियाेजन करणे शक्य हाेत नाही व गर्दी वाढते, हे आता थांबले पाहिजे, नीट नियाेजन करून नियम पाळण्याचे बंधन टाका, हातावर पाेट असणाऱ्यांची स्थिती अतिशय हालाखीची हाेत आहे.
श्रीकर साेमण
.................
काेराेना प्रतिबंधाची नियमावली ठरविताना शासन माेठ्या शहरांना डाेळ्यासमाेर ठेवते. त्यांचा दृष्टिकाेन लहान शहरांच्या बाबतीत तसाच असताे हे चुकीचे आहे. बांधकाम क्षेत्राबाबत नेमके हेच झाले असल्याने सध्या सारेच ठप्प आहे. हा व्यवसाय प्रचंड अडचणीत आला आहे, कराेडाेंची गुंतवणूक धाेक्यात आली आहे.
दिनेश ढगे
....................
सिमेंटची रॅक आल्यावर ती रॅक उतरविण्यासाठी एक हजारावर मजूर काम करतात. तिथे काेराेना नसताे का? आणि आम्ही एक गाेणी बॅग विकायचा प्रयत्न केला तर आमच्यावर दंडात्मक कारवाई हाेते. हा कुठला न्याय? सरकारने याचाही विचार करावा. या व्यवसायावर लाखाे लाेकांचा राेजगार आहे ते सध्या हवालदिल झाले आहेत
पुरूषाेत्तम अग्रवाल
............................
इलेक्ट्रानिक्स वस्तूंचा अत्यावश्यक सेवेत समावेश करणे आवश्यक आहे. वैद्यकीय क्षेत्रातही या उपकरणांची गरज आहे त्यामुळे हा व्यवसाय ठप्प करून चालणार नाही त्यांना मुभा दिलीच पाहिजे
भिकमचंद अग्रवाल
......................
लाॅकडाऊन हा उपाय हाेऊच शकत नाही. यामुळे कोराेना संपला नाही पण व्यापारी मात्र संपला आहे. शासन प्रशासनाने याचा विचार करावा, लाखाेंना राेजगार देणारे हे क्षेत्र आहे
पुरूषाेत्तम मालाणी
.......................
हाॅटेल रेस्टाॅरंट या व्यवसायाला पार्सलची सुविधा दिली आहे मात्र केवळ पार्सलच्या भरवशावर हा व्यवसाय तग धरू शकत नाही. आम्हाला सर्व नियम पाळून व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी.
याेगेश अग्रवाल
अध्यक्ष खाद्यपेय असाे.
...........................
ट्रान्सपाेर्ट व्यवसाय तर बंदच पडला आहे. माल वाहतुकीला परवानगी आहे मात्र ही वाहतूक करणाऱ्या चालकांना घरून व्यवसायाच्या ठिकाणापर्यंत जाण्याची परवानगी नाही, पाेलीस अडवणूक करतात, वाहनांचे व्याज सुरूच आहे , टॅक्सही कायमच आहे, हा व्यवसाय टिकेल तरी कसा?
मजहर खान
.....................
बाॅक्स...
लहान्याला मारा माेठ्यांना जगवा
शासनाच्या नियमांमध्ये जे माेठे उद्योग आहेत त्यांना परवानगी देण्यात आली आहे. सिमेंटसारख्या व्यवसायातून माेठ्या प्रमाणात जीएसटी मिळताे म्हणून त्याच्या रॅकच्या रॅक विकल्या जात आहेत मात्र लहान विक्रेत्यांना मुभा नाही, लहान्यांना मारा अन् माेठ्यांना तारा असाच हा प्रकार असल्याची भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
यांचाही हाेता सहभाग
ओमप्रकाश गाेयंका, जावेद खान, नवीन सिंग, वसंत बाछुका, दीपक वाेरा, प्रभाजित सहानी, अशाेक अहुजा, क्रिष्णा राठी, राेहित खंडेलवाल