अकोला, दि. 0४- मुस्लीम लीगच्या पाठोपाठ आता यूडीएफनेही अकोला महापालिका निवडणूक मैदान सोडले आहे. मुस्लिम समजाची पकड असलेले हे दोन्ही पक्ष आता कोणाच्या पाठीशी उभे राहतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागून आहे.अकोला महापालिके त मागील निवडणुकीत दोन नगरसेवकांना विजयी करणार्या यूडीएफनेही यंदा मैदान सोडले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंंतही यूडीएफने आपले उमेदवार घोषित केले नाही. याबाबत यूडीएफचे प्रमुख मुफ्ती अशपाक कासमी यांना विचारणा केली असता, यंदा आम्ही निवडणूक लढविणार नसल्याची माहिती त्यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलतांना दिली. यूडीएफच्या उमेदवारीवर ईमॅन्युअल हक कुरेशी यांची पत्नी आणि फैयाज खा यांची आई मागील महापालिका निवडणुकीत निवडून आल्या होत्या, तर डब्बूसेठ आणि गुड्ड नामक यूडीएफच्या उमेदवारांनी इतर पक्षांच्या उमेदवारांच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळे मुस्लीमबहुल प्रभागात यंदाही यूडीएफ निवडणूक मैदानात ताकदीनिशी उतरण्याची शक्यता होती; मात्र यूडीएफने अचानक माघार घेतल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या चरणात सर्व राजकीय पक्षांनी आपल्या पक्षांचे उमेदवार जाहीर केले; मात्र यूडीएफने शेवटच्या दिवशीही चुप्पी साधली आहे. याबाबत जेव्हा अशपाक यांना बोलते केले असता, त्यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. दरम्यान, मागे यूडीएफच्या नावाने ज्यांनी निवडणूक लढविली होती, त्यापैकी फैयाज खॉ यांनी राष्ट्रवादीचा तर कुरेशीने एमआयएमचा हात धरला आहे. मुस्लीम लीगच्या पाठोपाठ यूडीएफ नेही निवडणूक मैदान सोडल्याने महापालिकेच्या मुस्लीमबहुल आठ प्रभागांत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शक्ती वाढली आहे. आता एमआयएमचे उमेदवार या पक्षांची ताकद किती क्षीण करतात, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागून आहे.
मुस्लीम लीग पाठोपाठ यूडीएफनेही मनपा निवडणुकीचे मैदान सोडले
By admin | Published: February 04, 2017 2:28 AM