अकोला : ग्राहकांना गुणवत्तापूर्ण आणि अखंडित सेवा देण्यासाठी उपकेंद्रात करण्यात आलेल्या भरीव कार्यामुळे विदर्भात प्रथमच चार विद्युत उपकेंद्रांना ISO 9001:2015 मानांकन मिळाले आहे. विशेष म्हणजे ही चारही उपकेंद्रे ही अकोला शहरातील आहेत.
आयएसओ मानांकनासाठी आवश्यक असलेल्या ५९ सुधारणा पूर्ण केल्यामुळे अकोला शहरातील ३३ के.व्ही. खडकी,३३ के.व्ही.पी.के.व्ही, ३३ के.व्ही.कौलखेड आणि ३३ के.व्ही. सुधीर कॉलोनी या चार उपकेंद्रांना आय.एस.ओ. मानांकन प्राप्त झाले आहे.
३३ के.व्ही. खडकी येथील उपकेंद्रात आयोजित विद्युत उपकेंद्रांना आयएसओ मानांकन प्रदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर होते. अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट, प्रधान परिक्षक आय.एस.ओ.नंदकुमार देशमुख, सहाय्यक महाव्यवस्थापक मनिषकुमार भोपळे, कार्यकारी अभियंते जयंत पैकीने, विजयकुमार कासट, अनिल उईके, उपविधी अधिकारी सुनिल उपाध्ये, प्रणाली विश्लेषक नितीन नांदुरकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी अरूण शेलकर, प्रभारी कार्यकारी अभियंता अविनाश चांदेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता मनोज नितनवरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आयएसओसाठी परिश्रम घेतल्याबद्दल सहाय्यक अभियंते निखिल तापे,उमेशचंद्र होले, मुस्तफाहुसैन बोहरा यांच्यासह ३३/११ के.व्ही. खडकी उपकेंद्रातील यंत्रचालक प्रविण कोगदे, कैलास पखाले, अमोल ताले, ऋषिकेश माने पी.के.व्ही. उपकेंद्रातील प्रधान यंत्रचालक अशोक पेठकर, संदीप उपाध्याय, विद्याधर अंभोरे, अनिल गवारगुरू,३३ केव्ही सुधीर कॉलोनी उपकेंद्रातील प्रधान यंत्रचालक दिलीप दाळू, अमोल लाहुडकर, राजेंद्रकुमार आंबेकर, संदिप घुगरे आणि ३३ केव्ही. कौलखेड उपकेंद्रातील प्रधान यंत्रचालक नरेंद्र औतकर, दिनेश धाये,रुदानकर कुंभारे यांचा मुख्य अभियंता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला अकोला शहर विभागातील अतीरिक्त कार्यकारी अभियंते सुशिल जयस्वाल, गणेश महाजन, सुनिल खंडारे यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.