अकोला : राज्यातील सर्व घटकांचा सर्वंकष विकास व्हावा, याकरिता एसटी महामंडळद्वारे विविध प्रकारच्या प्रवास भाडे सवलत योजना प्रदान केल्या जातात; मात्र अनधिकृतरीत्या तयार करण्यात आलेल्या बोगस कार्डांच्या माध्यमातून या योजनांचा लाभ घेतला जात असल्याने एसटी महामंडळाच्या तिजोरीवर ताण पडत आहे. यावर लगाम कसण्यासाठी एसटी महामंडळ सरसावले असून, प्रवास भाडे सवलत योजनांचा लाभ घेणार्या प्रवाशांना यापुढे आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र दाखविणे बंधनकारक राहील. त्याची त्वरित अंमलबजावणी सुरू करण्याचे निर्देश २८ जानेवारीच्या परिपत्रकाद्वारे केंद्रीय वाहतूक व्यवस्थापकांनी अकोला विभाग नियंत्रकांना दिले आहेत.
प्रवास भाडे सवलतीसाठी आता ‘आधार’ची सक्ती
By admin | Published: February 03, 2015 12:37 AM