- राजरत्न सिरसाट
अकोला : कामगंध सापळे ‘बोंडअळी’ येण्याची सूचना देत असल्याने शेतकऱ्यांनी गुलाबी बोंडअळीच्या नायनाटासाठी शिफारशीप्रमाणे एकात्मिक किड व्यवस्थापन करणे महत्वाचे आहे.यासाठीचे मार्गदर्शन कापूस उत्पादक जिल्ह्यातील कृषी अधिकाºयांना कृषी विद्यापीठाने केले आहे. पण अलिकडे याच उपाययोजनेवर भर दिल्या जात असल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.मागीलवर्षी कपाशी पिकावर गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने राज्यातील ४० टक्क्यावर कपाशीचे उत्पादन घटले.याची दखल घेत यावर्षी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कृषी विद्यापीठ, कृषी विभागाने विविध उपाययोजना केल्या आहेत. यातील पहिली उपाययोजना म्हणजे कपाशीच्या शेतात एकरी दोन कामगंध सापळे लावण्या शिफारस करण्यात आली. हे कामगंध सापळे (फेरोमेन ट्रॅप) बोंडअळी अगोदरच्या अवस्थेतील पंतगाची सुचना देण्याचे काम करतात. कामगंध सापळ््यात तीन दिवसात आठ ते दहा बोंडअळीचे पंतग आढळल्यास त्या भागात बोंडअळी आल्याची ही महत्वाची सुचना आहे. त्यानुसार शेतकºयांना सुरू वातील निबोंळ अर्क ५ टक्के फवारणी करावी.अळ््यांची नुकसान करण्याची पातळी वाढण्यापूर्वी कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार एकात्मिक किड व्यवस्थापन करावे लागणार आहे. हेक्टरी २० कामगंध सापळे शेतात लावल्यास या सापळ््यात बोंडअळीचे पंतग अडकण्याचा दावा कृषी शास्त्रज्ञाकरवी केला जात आहे.या वषीच्या हंगामात गुलाबी बोंड अळीच्या पतंगाच्या हालचाली किंवा त्यांच्या पहिल्या पिढीची कश्या प्रकारे वाटचाल होते यासाठी जुन महिन्याच्या सुरुवातीलाच विदभार्तील अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा व यवतमाळ कापूस उत्पादक जिल्ह्यातील निवडक जिनिंग मिलमध्ये व विद्यापीठाच्या संशोधन केंद्र , कृषी विज्ञान केंद्र प्रक्षेत्रांवर फेरोमेन सापळे लाऊन त्यांचे टेहाळणी केली असता सर्वप्रथम जूनच्या शेवटच्या आठवड्यात हे पतंग फेरोमेन सापळ्यामध्ये आढळून आले.- कामगंध सापळ््यात पंतग जातात का?कपाशीच्या शेतात कामगंध सापळे लावल्याने त्याच्यात बोंडअळीचे पंतग अडकतातच का, हाही प्रश्न निर्माण झाला असून, यावर तर्कविर्तक सुरू आहेत.
असे करा एकात्मिक किड व्यवस्थापनजूनच्या पहिल्या पंधरवाड्यात लागवड झालेल्या कपाशीला पात्या व फुले अवस्थेत असल्यामुळे तेथे फेरोमन सापळे लावण्याव्यतिरिक्त प्रदुर्भावग्रस्त कोवळी बोंडे पात्या व डोमकळ्या नियमित शोधून त्या अळ्यासहित नष्ट कराव्या व त्वरित ५ टक्के निंबोळी अकार्ची किवा अझाडीरॅक्टीन ०.१५ टक्के २५ मिली १० लिटर पाण्यात घेउन त्वरित फवारणी करावी तर प्रादुर्भाव , लक्षणीय नुकसान असल्यास (५ ते १० टक्के फुलांचे, पात्या नुकसान) क्विनाल्फोस २५ टक्के एएफ २५ मिली किवा प्रोफेनोफोस ५० टक्के प्रवाही २० मिली १० लिटर पाण्यात घेऊन त्वरित फावारणी करावी. तसेच डोमकळ्या वेचून नष्ट करणे व फेरोमोन सापळ्यात पतंग अडकवून नष्ट करणे 'ा क्रिया नियमित सुरु ठेवाव्यात व यंदा गुलाबी बोंड अळीपासून होणारे नुकसान टाळावे असे आवाहन डॉ. विलास भाले यांनी केले आहे.- कामगंध सापळे लावणे अनिवार्यच आहे. यामुळे बोंडअळी आल्याची सुचना मिळते त्यानुसार कृषी विद्यापीठ,कृषी विभागाला शेतकºयांना मार्गदर्शन करू न एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा सल्ला दिला जातो. हेक्टरी २० सापळे लावल्यास बोंडअळीचे पंतग अडकून प्रादुर्भाक कमी होतो.डॉ. विलास खर्चे,संचालक संशोधन ,डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ,अकोला.