माजी महापाैर मदन भरगड यांची काॅंग्रेसमध्ये 'घरवापसी'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 20:11 IST2021-03-01T20:10:03+5:302021-03-01T20:11:18+5:30
Madan Bhargad माजी महापाैर मदन भरगड यांनी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

माजी महापाैर मदन भरगड यांची काॅंग्रेसमध्ये 'घरवापसी'
अकाेला : माजी महापाैर मदन भरगड यांनी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ते यांच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काॅंग्रेसमध्ये अतिशय आक्रमक नेते अशी त्यांनी ओळख हाेती; मात्र मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी काॅंग्रेसला साेडचिठठी देत वंचित बहूजन आघाडीमध्ये प्रवेश केला हाेता. अकाेला पश्चीम विधानसभा मतदारसंघात त्यांनी वंचित बहूजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुक लढविली हाेती. निवडणुकीनंतर ते शिवसेनेतही जाण्यास इच्छुक हाेते, अशी चर्चा हाेती; मात्र त्यांनी पुन्हा एकदा काॅंग्रेसमध्ये प्रवेशासाठीच प्रयत्न केले. साेमवारी मुंबई येथील गांधी भवन येथे विविध पक्षातील कार्यकर्त्यांनीही काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भरगड यांच्या पक्ष प्रवेशामुळे अकोल्यात काँग्रेस पक्ष संघटना अधिक बळकट होण्यास मदत होईल,असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी म्हणाले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष नसिम खान, प्रदेश उपाध्यक्ष हुसेन दलवाई, चारुलता टोकस, आ. वजाहत मिर्झा, मा. आ. हुस्नबानो खलिफे, सरचिटणिस व प्रवक्ते सचिन सावंत, प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे, अतुल लोंढे, संजय लाखे पाटील, ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद मोरे, पर्यावरण सेलचे प्रदीप वर्तक आदी उपस्थित होते.