शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांना अटक; कृउबास सहसचिवास मारहाण केल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 5:35 PM

Sanjay Gawande arrested : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव यांना मारहाण केल्याचे आरोपीखाली अकोट शहर पोलीसांनी गुन्हे दाखल करुन  अटक केली.

ठळक मुद्देन्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे  आदेश दिल्याने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली.शिवीगाळ करीत मारहाण करीत.सरकारी कामात अडथळा आणला.

अकोटःअकोट मतदारसंघाचे शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव यांना मारहाण केल्याचे आरोपीखाली अकोट शहर पोलीसांनी गुन्हे दाखल करुन  अटक केली.या प्रकरणी १८ एप्रिल रोजी न्यायालयाने त्याना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे  आदेश दिल्याने त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलीसातील अपराध पत्रानुसार,  बाजार समिती कार्यालयात  १७ एप्रिल रोजी सांयकाळी ५ वाजता दरम्यान बाजार समिती सहसचिव विनोद रमेश कराळे हे सहकारी कर्मचाऱ्यांसोबत काम करीत होते. यावेळी संजय लक्ष्मणराव गावंडे हे आले त्यांनी तुम्ही ड्युटी करीत नाही,लोकांना त्रास देता असे म्हणून शिवीगाळ करीत मारहाण करीत.सरकारी कामात अडथळा आणला. तसेच यापुढे लोकांची कामे वेळेवर नाही केली तर नौकरी करणे मुस्कील करुन देईल अशी धमकी दिली. या घटनेची माहीती बाजार समिती सभापती भारतीताई गावंडे व सचिव राजकुमार माळवे यांनी दिल्यानंतर सभापती व सचिव यांनी पोलीस स्टेशनला कायदेशीर तक्रार देण्यास सांगितले, अशी फिर्याद अकोट शहर पोलीस स्टेशनला सहसचिव विनोद कराळे यांनी दिली. या तक्रारीवरुन अकोट शहर पोलिसांनी  संजय गावंडे विरुद्ध भादंवि कलम ३५३, २९४, ३२३, ५०६ कलमान्वे गुन्हा दाखल केला. या प्रकरणी १८ एप्रिल रोजी पोलीसांचा मोठा ताफा अंबिकानगरातील माजी आमदार संजय गावंडे यांच्या निवासस्थानी पोहचला,सशस्त्र पोलीसासह आलेल्या पथकाने घराला वेढा दिल्यागत परिस्थितीत गावंडे यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला अटक केली. न्यायालयात हजर केले असता, माजी आमदार संजय गावडे यांनी स्वतःच न्यायालयीन प्रक्रियेत भाग घेत  खोटा गुन्हा दाखल केल्याचे सांगत जामीन घेण्यात नकार दिला. दरम्यान या ठिकाणी जमा झालेल्या सहकार्यानी समजुत काढल्यानंतर वकील ठेवण्यात आले. पंरतु जामीन देण्याचे अधिकार अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयास असल्याने त्यांना जामीन मिळू शकला नाही.  त्यामुळे न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिल्याची माहीती अँड अविनाश अग्रवाल यांनी दिली. यावेळी पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या सह इतर पोलीस अधिकारी,राज्य राखीव दलाची तुकडी,पोलीस कर्मचारी असा बराच मोठा बंदोबस्त तैनात होता. न्यायालयाचे आदेशानुसार संजय गावंडे यांची अकोला जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. न्यायालयात सरकारी वकील म्हणून जयकुमार गावंडे, अँड आर.बी अग्रवाल, अँड अविनाश अग्रवाल यांनी काम पाहीले.  अकोट बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार,घोळ उघड झालेले असुन चौकशी सुरु आहेत.शेतकऱ्यांना योग्य वागणुक न देता कर्मचारी काम करीत नाही,या सर्व प्रकाराबद्दल बाजार समितीत विचारपुस करायला गेलो असता,सचिव माळवे नेहमी प्रमाणे गैरहजर असल्याने सहसचिव समोर आहे. त्यांनी योग्य उत्तरे दिली नाही,अरेरावी केली,मद्यधुंद अवस्थेत होते.त्यांचे सोबत केवळ बाचाबाची झाली. कोणतीही मारहाण केलीच नाही,शिवाय सरकारी कामात अडथळा आणला नाही तरी सुध्दा मद्यधुंद अवस्थेत पोलीसात  सहसचिव गेले. त्यांची वैद्यकीय तपासणी न करतांच माझ्यावर एकतर्फी खोटा गुन्हा दाखल केला. यापूर्वी शेतकऱ्यांवरील अन्याय,अत्याचार प्रश्नावर अनेक आंदोलन केली,गुन्हे दाखल झाले. शिवसेनेचे शेतकरी दिवाकर रावते यांचे जडणघडणीत शेतकऱ्यांना न्याय मिळुन दिला आहे. यापुढे शेतकऱ्यांचे समस्या सोडविताना कितीही गुन्हे दाखल झाले तरी चालतील आपण शेतकऱ्यांसोबतच राहु,बाजार समितीमधील सर्व गैरप्रकार समोर आल्यानंतर मारहाणीसंदर्भात खंरखोट समोर येईलच.-संजय गावंडे माजी आमदार अकोट मतदारसंघ

टॅग्स :akotअकोटSanjay Gaikwadसंजय गायकवाडShiv Senaशिवसेना