............................
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अकोला : स्थानिक अकोट फाइल परिसरातील हनुमान चौक, अशोकनगर व बाबू जगजीवनराम चौक, मोची पुरा या दोन ठिकाणी सेवा सप्ताहात प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आ.गोवर्धन शर्मा, आ. तथा जिल्हाध्यक्ष रणधीरभाऊ सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चनाताई मसने, महानगर सरचिटणीस अक्षय गंगाखेडकर, संजय गोडा, संजय गोटफोडे, उपमहापौर राजेंद्र गिरी, प्रभाग २च्या नगरसेविका अनिता राजेश चौधरी यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
.........
परीक्षेपासून वंचित ठेऊ नका
अकाेला : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्नित काही महाविद्यालयांतील बहुतांश विद्यार्थी महाविद्यालयीन शुल्क व इतर शुल्क भरू न शकल्यामुळे अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठाने पुरविलेले परीक्षा प्रवेशपत्र न देणे, हिवाळी-२०२० परीक्षेची लिंक विद्यार्थ्यांना, तसेच महाविद्यालयीन शुल्क भरल्याशिवाय उन्हाळी-२०२१ परीक्षेकरिता परीक्षा आवेदनपत्रे न भरू देणे इत्यादीबाबत तक्रारी असून, काेणत्याही कोणताही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.हेमंत देशमुख यांनी दिली आहे.
.......................
उघडे राेहित्र धाेकादायक
अकाेला : येथील मोठी उमरी परिसरातील द्वारका नगरमध्ये गणेश नंदूरकार याच्या घरा समोरील राेहित्र उघडे असल्याने, ते परिसरातील नागरिकांसाठी धाेकादायक ठरण्याची शक्यता आहे.
............................
आदिनाथ मंडळाला मिळाली राष्ट्रीय पुरस्कार
अकोला : स्थानिक अकोला आदिनाथ नवकार मंडळाला नवकार मंत्र जपासाठी राष्ट्रीय स्तरावरची ट्रॉफी २०२० प्रदान करण्यात आली. भगवान पार्श्वनाथ यांच्या नवकार मंत्राच्या २ माळा जपून बारा वर्षांत तब्बल नऊ लाख नवकार मंत्राचा जप करून, समाजात राष्ट्रीय मानांकन प्राप्त करणाऱ्या या मंडळाला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. नवलखा नवकार जाप मंडळाची स्वर्णजयंती, पू गुरुदेव जयदर्शन विजयजी मसा.यांचा ३१वा वार्षिक दीक्षा दिन तथा अकोला नवकार मंडळाचा अकराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, येथील श्री आदिनाथ जैन श्वेतांबर मंदिरात हा ट्रॉफी वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी बालिका हर्शवी शहा, खुशी शहा यांनी उत्कृष्ट सांस्कृतिक नृत्य सादर करून परिसरात भक्तिभाव उत्पन्न केला. या बहारदार भक्ती सोहळ्याचे संचालन प्रतिभा मेहता, नीता वसा, यामिनी शाह यांनी तर आभार प्रदर्शन पार्थ शहा यांनी केले. यावेळी आदिनाथ जैन श्वेतांबर मंदिराचे अध्यक्ष मणिलाल लापशीया, देवेंद्र शहा, शैलेश शाह, प्रकाश भंडारी, मुकेशभाई कोरडीया, राजू भंडारी, लॅबेन लॅबचे भरतभाई शहा, पार्थ शाह, संभवनाथ जैन मंदिराचे स्वप्निल शाह, वासुपूज्य जैन मंदिराचे राजेश शहा, मनोज शाह, ईश्वर शाह, मयूर शाह, हितेश शाह, हितेश मेहता, रश्मी शहा, मोहीत मेहता, दिलीप शाह, नीता शहा, प्रतिभा मेहता, नीता वसा, यामिनी शाह, नेहा दोशी, ज्योती शाह, प्रीती मेहता आदी उपस्थित होते.