लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : गणेश विसर्जनाकरिता गेलेल्या आकोट ये थील दिनेश श्रीराम गुजर (२३) या गणेशभक्ताचा मृ तदेह पोपटखेडच्या धरणातून ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता सुमारास सापडला. २४ तास शोध मोहीम राबवून धरणातील पाणी साठा असलेल्या मधोमध त्याचा मृतदेह पिंजर येथील संत गाडगेबाबा आप त्कालीन शोध व बचाव पथकाच्या कार्यकर्त्यांनी काढला. अकोट येथील सूर्यवंशी गणेश मंडळाचे पदाधिकारी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याकरिता ७ सप्टेंबर रोजी पो पटखेड येथील धरणावर गेले होते. यावेळी दिनेश गुजर हा २३ वर्षीय युवक पाण्यात बुडाला. पोपटखेड येथील पट्टीचे पोहणारे रामभाऊ सुरत्ने, पुरुषोत्तम भास्कर, फकिरा मोरे यांनी मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. त्यानं तर ८ सप्टेंबरला मुंडगाव येथील संत नगरी बचाव पथक व पिंजर येथील संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथक पोहचले. त्यांनी ४५ किलोची लोखंडी रॅम् प वायर रोपला बांधून रबर रेस्क्यू बोटच्या साह्याने पथक प्रमुख दीपक सदाफळे, त्यांचे सहकारी प्रशांत सनगाळे, संजय शेळके आकोट, महेश साबळे, प्रशांत सनगाळे, विशाल सनगाळे, मुंडगाव येथील संत नगरी आप त्कालीन सेवा पथक यांनी शोध मोहीम राबवित दिनेश गुजरचा मृतदेह बाहेर काढला. घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मनवरे, तहसीलदार विश्वनाथ घुगे, पोलीस निरीक्षक मिलिंद बहाकर, पोलीस उपनिरीक्षक शहाजी रुपनर यांनी भेट दिली. याप्रसंगी हे.काँ. हशमत खान पठाण, मंडळ अधिकारी प्रशांत सायरे, तलाठी ओईंबे, देशमुख, चव्हाण, बोकाडे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग तायडे, पोपटखेड येथील गावकरी व गणेश मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते.
धरणात बुडालेल्या युवकाचा मृतदेह आढळला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:51 AM