मूर्तिजापूर : समाज क्रांती आघाडी या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते अॅड. प्रा. मुकुंद खैरे यांचे बुधवारी सकाळी ९:३० वाजता अकोला येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते. प्रा. मुकुंद खैरे हे अनेक दिवसांपासून कोरोना आजाराशी लढा देत होते. सोबतच त्यांच्या पत्नी व मुलगी यांनाही कोरोनाची लागन झाली होती. गत आठवड्यात पत्नीचे तर २ मे रोजी मुलीचे कोरोनामुळे निधन झाले. त्यानंतर ५ मे रोजी उपचारादरम्यान अकोला येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांनी येथील गाडगे महाराज महाविद्यालयात राज्य शास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असतानाच समाज क्रांती आघाडी या सामाजिक संस्थेची ६ डिसेंबर १९९१ रोजी स्थापना केली. ही संघटना पुढे नेत त्यांनी संघटनेचे देशभर जाळे विणले. ते राज्य घटनेचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी अनेक आंदोलने करुन शोषितांच्या हक्कासाठी लढा दिला. समाज क्रांती आघाडी या सामाजिक आंदोलन करणाऱ्या संघटनेची चैत्यभूमी मुंबई येथे स्थापना .बुद्ध गया मुक्ती आंदोलन, संविधान बचाव, राजकारणाला भ्रष्ट्राचातून मुक्तीचे आंदोलन, दसरा छोडो २४ऑक्टोबर का स्वीकार करो,भूमिहीनांचे प्रश्न,आरोग्याच्या अधिकारा साठी लढा देत झटले. १० वर्षांपासून प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश विधानसभा आणि लोक सभा निवडणूक लढविली .आदिवसिंचे प्रश्न धसास लावले .संविधानाचे गाढे अभ्यासक, प्रभावी वक्ते, कुशल संघटक म्हणून ख्याती होती. आंबेडकरांच्या विचाराने प्रभावित. बहुजनांमधे त्यांची सदैव आस्था होती. आठ दिवसापूर्वी पत्नी छायाताई खैरे ,शताब्दी मुलगी कोरोनाने यांचे निधन झाले. कोणताही राजकीय वारसा नसताना राजकारणात स्वतंत्र प्रतिमा त्यांनी निर्माण केली. त्यांच्या अकाली जाण्याने मूर्तिजापूर नागरीवर शोककळा पसरली. सामाजिक व राजकीय स्तरातून अनेकांनी आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या.
समाज क्रांती आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मुकुंद खैरे यांचे कोरोनामुळे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 11:39 AM
Mukund Khaire dies due to corona : सकाळी ९:३० वाजता अकोला येथील खासगी रुग्णालयात कोरोनामुळे निधन झाले.
ठळक मुद्देगत आठवड्यात पत्नीचे तर २ मे रोजी मुलीचे कोरोनामुळे निधन झाले. मुकुंद खैरे हे अनेक दिवसांपासून कोरोना आजाराशी लढा देत होते.