कारंजा (जि.वाशिम) : येथील दलितोद्धार व समाजसेवा बहुउद्देशीय संस्थेद्वारा संचालित सिद्धार्थ मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे संचालक कृष्णराव टिकूजी मेश्राम (वय ७५) यांनी २७ मे रोजी गळफास लावून आत्महत्या केली. येथील प्रगती नगरमधील रहिवासी कृष्णराव टिकूजी मेश्राम हे रिद्धीसिद्धि कॉलनीतील सिद्धार्थ मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे संचालक होते. हृदयाच्या आजाराने पीडित होते. याशिवाय डोक्यावर कर्जाचा डोंगरही होता. त्यामुळे त्यांनी शनिवारी सकाळी ८.३0 वाजताच्या दरम्यान आत्महत्या केली., असे त्यांचा मुलगा कुंदन कृष्णराव मेश्राम (वय ३८) यांनी फिर्यादीत नमुद केले आहे. सुट्टयांमुळे वसतीगृहात कुणीही नाही. कृष्णराव टिकूजी मेश्राम हे के.पी.मेश्राम या नावाने सर्वत्न परिचित होते.. उमेदीच्या वयापासून त्यांनी आंबेडकर चळवळीत काम केले. नव्वदच्या दशकात त्यांनी भारिप बहुजन महासंघाकडून विधानसभा निवडणूक लढविली होती. गेल्या ४0 वर्षापासून त्यांनी आंबेडकर चळवळीत राहुन दिनदुबळ्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न केले. नामांतरणाच्या लढ्यात त्यांचा सहभाग होता.
कारंजात वसतीगृह संचालकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2016 1:34 AM