अकोला : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात आतापर्यंत पेड न्यूजची चार प्रकरणे दाखल झाली असून, ही प्रकरणे माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीने संबंधित निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठविली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा माध्यम संनियंत्रण व प्रमाणीकरण समितीचे अध्यक्ष अरुण शिंदे यांनी शुक्रवारी दिली.जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा माध्यम संनियंत्रण समितीची बैठक, १0 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकार्यांच्या दालनात पार पडली. जिल्हाधिकारी अरुण शिंदे, अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, आकाशवाणीचे कार्यक्रम अधिकारी जगदीश राव, जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस शौकतअली मिरसाहेब यांच्यासह बाळापूर, आकोट मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकार्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यातील पाचही मदारसंघातील पेड न्यूज, वृत्तपत्र व स्थानिक केबल वाहिन्यांवरून प्रसारित होणार्या जाहिरातीबाबतचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.
पेड न्यूजची चार प्रकरणे दाखल
By admin | Published: October 11, 2014 12:30 AM