अकोला: जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच असून, शुक्रवारी आणखी चार रुग्णांचा बळी गेला, तर ३१७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये ९९ रॅपीड अँटिजन चाचणीचे, तर २१८ आरटीपीसीआर चाचणीचे पॉझिटिव्ह अहवाल आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांसह मृतकांच्या वाढत्या संख्येवर अंकुश लावण्याचे आरोग्य विभागासमोर मोठे आव्हान आहे, मात्र नागरिकांच्या बेफिकिरीमुळे कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार, चार रुग्णांचा मृत्यू झाला असून, यामध्ये रामदासपेठ येथील ८५ वर्षीय रुग्णासह बार्शिटाकळी तालुक्यातील भेंडी महल येथील ६५ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. तसेच सायंकाळी खासगी रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. यामध्ये अकोट तालुक्यातील उमरा येथील ५८ वर्षीय रुग्णासह कौलखेड परिसरातील ६९ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. आरटीपीसीआर चाचणी अहवालातील २१८ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये अकोट येथील ३२, पातूर येथील ११, तेल्हारा येथील नऊ, डाबकी रोड व खडकी येथील प्रत्येकी सहा, मोठी उमरी, कौलखेड, सांगावा मेळ,पारस व बाळापूर येथील प्रत्येकी चार, वनी वेताल ता.अकोट,गोरक्षणरोड, आदर्श कॉलनी, देशमुख फैल, मलकापूर व शास्त्री नगर येथील प्रत्येकी तीन, सिंधी कॅम्प, रणपिसे नगर, न्यु तापडीया नगर, जठारपेठ, बार्शीटाकळी, टिटवा, कान्हेरी, कवथा सोपीनाथ व समित्रा हॉस्पीटल येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित कावरामा सोसायटी, सहकार नगर, दुर्गा चौक, तुकाराम चौक, हरिहर पेठ, निंभोरा, महसूल कॉलनी, जूने शहर, शेलार फैल, रेणूका नगर, जामठी बु., दगडपारवा, जामकेश्वर, रंभापूर, दानापूर, अडगाव, महागाव बु., आनंद नगर, कैलास टेकडी, अकोली जहाँगीर, कान्हेरी गवळी, घुसर, शिवसेना वसाहत, गजानन नगर, गायगाव, वरोडी, नागद, कृषी नगर, वनी धोरार्डी, कपिला नगर, तापडीया नगर, कुटसा, लहान उमरी, तरोडा, खोलेश्वर, दगडीपूल, केशवनगर, आळशी प्लॉट, खेडकर नगर, गिता नगर, टेलीफोन कॉलनी, समता नगर, स्टेशन एरिया, घुंगसी, तहसिल ऑफीस, डीएचडब्लू, जवाहर नगर, जहाँगीर, गोरेगाव, तुकाराम हॉस्पीटल, अकोट फैल, रामदासपेठ, भिमनगर व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. तसेच आज सायंकाळी ४४ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये अकोट येथील १४, महान व गाडेगाव कोर्ट येथील प्रत्येकी पाच, तेल्हारा येथील चार, तळेगाव बाजार येथील तीन, बांगरगाव ता.तेल्हारा येथील दोन, तर उर्वरित राजूरा ता.अकोट, खिरकुंड बु. ता.अकोट, बाळापूर, हिवरखेड, वरखेड, झोडगा, मालेगाव ता.तेल्हारा, खोपडी ता.बार्शीटाकळी, पुनोती, अंजनी व राजंदा येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४६२ जणांचा मृत्यू झाला असून, २२ हजार ७८९ जणांनी कोरोनावर मात केली. सद्यस्थितीत पाच हजार २४ रुग्णांवर उपचार सुरू असून, यातील बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात आहेत.
६२८ जणांना डिस्चार्ज
रुग्णसंख्या वाढत असताना कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे. शुक्रवारी आणखी ६२८ रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये ५४० रुग्ण गृह विलगीकरणातील आहेत.