अकोला : अकोला शहराची तहान भागविणारे तथा जिल्ह्यातील सर्वात मोठे काटेपूर्णा धरणाचे चार वक्रद्वार शनिवार, १ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उघडण्यात आले. यामधून 32.80 क्यूमेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.महान येथील काटेपूर्णा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या धरणात ८५ टक्के जलसंचय झाला आहे. जुलै महिन्यातच ८० टक्के पेक्षा अधिक जलसाठा झाल्याने धरणातील पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. त्या अनुषंगाने शनिवारी सकाळी ११ वाजता धरणाचे चार वक्रद्वार उघडण्यात आले. यामधून 32.80 क्यूमेक विसर्ग करण्यात येत आहे. धरणाचे दरवाजे उघडली जाणार असल्याने शुक्रवारीच नदीकाठच्या गावांना इशारा देण्यात आला होता.अकोला व मुर्तीजापूर शहराची तहान भागविण्यासह सिंचनासाठी उपयुक्त असलेल्या महान धरणात यावर्षी जुलै महिन्यातच मोठ्या प्रमाणात जलसंचय झाला आहे. वाशिम जिल्ह्यात यंदा जोरदार पाऊस झाल्याने काटेपूर्णा धरण भरले आहे. पाण्याची पातळी कायम ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात येत आहे.
काटेपूर्णा धरणाचे चार वक्रद्वार उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 12:55 PM
काटेपूर्णा धरणाचे चार वक्रद्वार शनिवार, १ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता उघडण्यात आले.
ठळक मुद्दे १५० क्यूसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे.पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने या धरणात ८५ टक्के जलसंचय झाला आहे.