अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, मंगळवार, ९ सप्टेंबर आणखी चौघांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा १७२ वर गेला. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये १११, नागपूरच्या खासगी प्रयोगशाळेच्या अहवालात १८ अशा एकून १२९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ४९६४ झाली आहे. दरम्यान, ९८ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ४१८ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १११ पॉझिटिव्ह असून, उर्वरित ३०७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आहे.पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्य म्हैसांग व डाबकी रोड येथील प्रत्येकी आठ , जीएमसी येथील सात, कट्यार, खदान व तांदळी बु. ता. पातूर येथील प्रत्येकी चार, लहान उमरी, सिंधे कॅम्प, मोठी उमरी, गौरक्षण रोड येथील प्रत्येकी तीन, आळशी प्लॉट येथील चार जण, गोरक्षण रोड येथील तीन जण, गाडेगाव ता. तेल्हारा, रामदास पेठ, कौलखेड, मोठी उमरी, आदर्श कॉलनी व सुधीर कॉलनी येथील प्रत्येकी दोन, मलकापूर, जठारपेठ, पोलिस स्टेशन चन्नी, कौलखेड, रजपूतपुरा ता. बाळापूर, रेणूका नगर व बाळापूर येथील प्रत्येकी दोन, पिंपरगाव छाब्रे ता. बार्शिटाकळी, पळसोबढे, खेडा, गीता नगर, संत नगर, रणपिसे नगर, कुबेर नगर, गीता नगर, रेल्वे पोलिस, मालीपूरा, वाखना वाघ, पिंपरी ता.अकोट, खेतान नगर, दिगरस ता. पातूर, अकोट फैल, खापरवाडा, वाडेगाव ता.बाळापूर, जूने शहर, केशवनगर, मलकापूर, निमवाडी, तापडीया नगर, पिंजर, तेल्हारा, शास्रीेनगर, मुर्तिजापूर, बेलूरा (खु.), महसूल कॉलनी, जठारपेठ, मलकापूर व अकोट येथील येथील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे.
अकोला, बाळापूर, राजनापूरातील रुग्णांचा मृत्यूअकोला येथील ६६ वर्षीय पुरुष, डाबकी रोड येथील ८४ वर्षीय पुरुष , बाळापूर येथील ५५ वर्षीय पुरुष, मुर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर येथील ६० वर्षीय पुरुष या चौघांचा बुधवारी मृत्यू झाला. या तिघांना अनुक्रमे ६ सप्टेंबर, ३ सप्टेंबर, ३१ आॅगस्ट व ५ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आले होते.
९८ जणांना डिस्चार्जबुधवारी दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून ६४, कोविड केअर सेंटर, अकोला येथून २८, हॉटेल रिजेन्सी येथून पाच, कोविड केअर सेंटर, बाशीर्टाकळी येथून एक अशा एकूण ९८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.
१०६६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्हजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४९६४ लोकांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल ३७२६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १७२ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत १०६६ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु आहेत.