अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच असून, या संसर्गजन्य आजाराला बळी पडणाऱ्यांची व लागण होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. बुधवार, १९ आॅगस्ट रोजी जिल्ह्यात आणखी चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबाधितांच्या बळींचा आकडा १४१ वर गेला आहे. तर १८ नवे पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ३३३१ झाली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ‘व्हीआरडीएल’ प्रयोगशाळेकडून बुधवारी दिवसभरात आरटीपीसीआर’ चाचणीचे १३७ अहवाल प्राप्त झाले. यापैकी १८ जण पॉझिटिव्ह असून, उर्वरित ११९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पाच महिला व नऊ पुरुष आहेत.यामध्ये मुर्तिजापूर येथील पाच व बार्शिटाकळी येथील दोन जणांसह गौरक्षण रोड, गायत्री नगर, पिंजर ता.बार्शिटाकळी, राजणखेड ता.बार्शिटाकळी, हातगाव ता. मुर्तिजापूर व बेलखेड ता. तेल्हारा, भीम नगर, डाबकी रोड, अकोट व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे.चौघांंचा मृत्यूकोरोनावर उपचार घेत असलेल्या चौघांचा बुधवारी मृत्यू झाला. यामध्ये गुलजारपूरा येथील ३५ वर्षीय महिला, कोठारी-पैलपाडा येथील ६५ वर्षीय पुरुष, तेल्हारा तालुक्यातील बेलखेड येथील ८२ वर्षीय पुरुष व रायखेड येथील ७० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. गुलजारपूरातील महिलेस १६ आॅगस्ट रोजी, पैलपाडा येथील रुग्णास १० आॅगस्ट रोजी, बेलखेड येथील रुग्णास १७ आॅगस्ट रोजी, तर रायखेड येथील रुग्णास १६ आॅगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते.५८ जणांना डिस्चार्जबुधवारी दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १७, कोविड केअर सेंटर येथून तीन, उपजिल्हा रुग्णालय मूर्तिजापूर येथून पाच, आयकॉन हॉस्पीटल येथून दोन, हॉटेल रेजीन्सी येथून एक, कोविड केअर सेंटर, हेंडज मुर्तिजापूर येथून २२, तर कोविड केअर सेंटर, अकोट येथून आठ अशा एकूण ५८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.३७३ जणांवर उपचार सुरुजिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३३३१ जणांना कोरोनाची लागण झाली असून, यापैकी तब्बल २८१७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत ३७३ अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर रुग्णालयांत उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
एकाच दिवशी चौघांचा मृत्यू; १८ नवे पॉझिटिव्ह; ५८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 6:08 PM