अकोला : सामान्य जनतेची निकड लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जनरल डबे वाढविण्याचा निर्णय घेतला असून, ऑक्टोबर महिन्यापासून अकोला मार्ग धावणाऱ्या ४ एक्स्प्रेस गाड्यांमध्ये ४ जनरल कोचची सुविधा देण्यात येणार आहे. आता एक्सप्रेसला समोर दोन आणि मागच्या बाजूला दोन असे एकूण चार जनरल कोच असतील. त्यामुळे जनरल डब्यांमध्ये होणारी गर्दी आता कमी होणार आहे.
अत्यंत कमी तिकिटात लांबचा प्रवास घडविणारी रेल्वे ही खऱ्या अर्थाने लोकवाहिनी आहे. तथापी, रेल्वे गाड्यांमध्ये अनारक्षीत अर्थात जनरल डबे कमी असल्याने सर्वसामान्यांचा प्रवास मोठा धकाधकीचा ठरतो. बहुतांश गाड्यांमध्ये केवळ दोनच जनरल डबे आहेत. त्यामुळे जनरल डब्यांमध्ये प्रवांची तुुंबळ गर्दी होते. पाय ठेवण्यासही जागा नसलेल्या डब्यात प्रवाशांना नाईलाजाने प्रवास करावा लागतो. सर्वसामान्य प्रवाशांची ही अडचण लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस गाड्यांमध्ये जनरल डबे वाढविण्याचे नियोजन केले आहे. यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरळीत आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे.
कोणत्या एक्स्प्रेसला कधीपासून अतिरिक्त जनरल कोच
१३४२५ मालदा टाउन-सुरत एक्स्प्रेस : २६ ऑक्टोबर पासून१३४२६ सुरत- मालदा टाउन एक्सप्रेस : २८ ऑक्टोबर पासून२२५१२ कामाख्या-एलटीटी एक्सप्रेस : ७ डिसेंबर पासून२२५११ एलटीटी-कामाख्या एक्सप्रेस : १० डिसेंबर पासून२०८५७ पुरी-साई नगर शिर्डी एक्सप्रेस : २९ नोव्हेंबर पासून२०८५८ साईनगर शिर्डी-पुरी एक्सप्रेस : १ डिसेंबर पासून२२८६६ पुरी- एलटीटी एक्सप्रेस : २६ नोव्हेंबर पासून२२८६५ एलटीटी-पुरी एक्स्प्रेस : २८ नोव्हेंबर पासून