लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : थकीत मालमत्ता करापोटी शनिवारी महापालिकेने शहरातील चार मोबाइल टॉवरसह एका मालमत्तेला सील लावण्याची कारवाई केली. ही कारवाई मनपा आयुक्तांच्या आदेशान्वये उपायुक्त वैभव आवारे, कर अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.मनपाच्या दक्षिण झोन अंतर्गत येणाऱ्या सिंधी कॅम्पस्थित किसनचंद छताणी, टॉवर विजन इंडिया प्रा. लि. यांच्या मालमत्ता क्र. डी.-३,६१० यांच्याकडे २०१८ पासून थकीत मालमत्ता कर ६४ हजार ३३९ रुपये होता. तसेच कौलखेड येथील नीलेश लहरिया ए.टी.सी. टेलिकॉम टॉवर कॉर्पोरेशन यांची मालमत्ता क्र. डी.-८,२२१६ यांच्याकडे २०१६ पासून थकीत मालमत्ता कर २ लाख १० हजार ३१३ रुपये होता. पूर्व झोन अंतर्गत रेल्वे स्थानक ावरील बकाल प्लाझा येथील रिलायन्सचे मोबाइल टॉवर मालमत्ता क्र. ए-२, १५५६ यांच्याकडे २०१९ पासून ७४ हजार ६१९ रुपये थकीत मालमत्ता कर आहे. तसेच बिर्ला रोड येथील सोमाणी अपार्टमेंटवरील ए.टी.सी. टेलिकॉम टॉवर कॉर्पोरेशन यांच्या मालमत्ता क्र. ए-२,१०९० यांच्याकडे २०१९ पासून १लाख ४ हजार ६५७ रुपये थकीत होता. थकीत कराचा भरणा करण्यासाठी वारंवार सूचना देऊनही त्यांनी कराचा भरणा न केल्याने शनिवारी चारही मोबाइल टॉवरला सील लावण्याची कारवाई करण्यात आली. तसेच दगडी पुलाजवळीत रामस्वरूप व रामपाल सारडा यांची शारदा आॅइल इंडस्ट्रीज मालमत्ता क्र. सी-६,३०२ आहे. त्यांच्याकडे २०१७ पासून १लाख ४४ हजार १५९ रुपये थकीत मालमत्ता कर होता. त्यांच्यावरही मनपाने कारवाई करीत मालमत्तेवर सील लावण्याची कारवाई केली. ही कारवाई सहा. कर अधीक्षक राजेंद्र गाडगे, देवेंद्र भोजने, प्रशांत बोळे, विजय बडोणे, अनिल नकवाल, संजय सूर्यवंशी, सुनील इंगळे, मोहन घाटोळ, प्रधान देवकते, प्रवीण इंगळे, अरुण बोरकर, महेंद्र डिकाव, प्रकाश कपले, सुरक्षा रक्षक प्रदीप गवई, नीलेश ढगे, शोभा पांडे व तेजराव तायडे यांनी केली.
चार मोबाइल टॉवर; एका मालमत्तेला ‘सील’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 11:07 AM