अकोला : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवार, १७ मार्च रोजी आणखी चार कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ४११ झाला आहे. आरटीपीसीआर चाचण्यांमध्ये २६५ तर रॅपिड ॲन्टिजेन चाचण्यांमध्ये ६० अशा एकूण ३२५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या २२,५६३ वर पोहोचली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या व्हीआरडीएल लॅबकडून बुधवारी आरटीपीसीआर चाचण्यांचे ८९६ अहवाल प्राप्त झाले. यापैकी २६५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, उर्वरित ६३१अहवाल निगेटिव्ह आहेत. सकाळी पॉझिटिव्ह अहवाल आलेल्यांमध्ये अकोट येथील २७, पारस येथील २२, कानशिवणी व मोठी उमरी येथील प्रत्येकी १०, हिवरखेड व पातूर येथील प्रत्येकी आठ, खडकी, कौलखेड, बोरगाव मंजू व तेल्हारा येथील प्रत्येकी सहा, जीएमसी व डाबकी रोड येथील प्रत्येकी पाच, जूने शहर, गोरक्षण रोड, सिंधी कॅम्प, अडगाव, मुर्तिजापूर, टाकळी खोजबोळ, मलकापूर व बाळापूर येथील प्रत्येकी चार, बार्शीटाकळी, भौरद, किर्ती नगर, सिरसो, लहान उमरी, राम नगर, खोलेश्वर, डोंगरगाव, वाडेगाव व शिवाजी नगर येथील प्रत्येकी तीन, रामदासपेठ, आळशी प्लॉट, कैलास टेकडी, तापडीया नगर, शिवणी, देवरावबाबा चाळ, तुकाराम चौक, जवाहर नगर, सुकळी, उरळ,कासली खुर्द, तोष्णीवाल लेआऊट, रणपिसे नगर व भारती प्लॉट येथील प्रत्येकी दोन, आनंद नगर, कडोसी, व्हिएचबी कॉलनी, ओपन थेटर्स, गौतम नगर, धामणी, अकोट फैल, खैर मोहमद प्लॉट, अंदुरा, कुंभारी, एमआयडीसी, तारफैल, अंबिका नगर, रेल्वे कॉलनी, राहुल नगर, भिम नगर, शितला माता मंदीर, कान्हेरी सरप, हिंगणा फाटा, खदान, सोनटक्के प्लॉट, खिनखीनी, घुसर, पिंपळगाव, हाता, विद्या नगर, मंडुरा, कुंडा, पणज, दत्त कॉलनी, बालाजी नगर, वानखडे नगर, लहरिया प्लॉट, गुडधी, जठारपेठ, मोरेश्वर कॉलनी, कान्हेरी गवळी, मोरगाव, पाथर्डी, सिरसोली, माता नगर, सुधीर कॉलनी, लकडगंज, केशव नगर, निमवाडी, तिवसा, मोहता मिल, अनिकट, आदर्श कॉलनी, बंजारा नगर, राजनखेड, रजपूतपुरा, गायगाव, देशमुख फैल, चिखलगाव व कृषी नगर येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे
चौघांचा मृत्यू
पळसो बढे ८० वर्षीय महिला, पातूर येथील ८० वर्षीय महिला, बार्शीटाकळी येथील ६० वर्षीय पुरुष व पोळा चौक, अकोला येथील ९० वर्षीय पुरुष अशा चार कोरोनाबाधित रुग्णांचा बुधवारी मृत्यू झाला. या चौघांनाही अनुक्रमे १४ मार्च व १६ मार्च रोजी दाखल करण्यात आले होते.
५,३८२ ॲक्टिव्ह रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २२,५६३ जणांना कोरोनाची लागण झाली असून, त्यापैकी तब्बल १६,७७० रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ४११ जणांचा मृत्यू झाला असून, सद्य:स्थितीत ५,३८२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.