अकोला : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी जिल्ह्यातील अकोला पूर्व, अकोला पश्चिम आणि बाळापूर या तीन मतदारसंघात चार उमेदवारांचे पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, पाचही मतदारसंघात ६२ इच्छुक उमेदवारांना १२१ उमेदवारी अर्जांचे वाटप करण्यात आले. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शनिवार, २0 सप्टेंबरपासून सुरू झाली. त्यामध्ये अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी बुधवारी अकोला पूर्व मतदारसंघातून भारिप-बमसंचे विद्यमान आमदार हरिदास भदे, अकोला पश्चिम मतदारसंघातून आंबेडकरवादी रि पब्लिकन पार्टीचे डॉ. धनंजय नालट, अपक्ष संतोष ढोले, बाळापूर मतदारसंघातून अपक्ष प्रदीप देशमुख इत्यादी चार उमेदवारांकडून पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये नालट यांनी एक अर्ज आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टीच्या नावाने तर दुसरा अर्ज प्रहार संघटनेच्या नावाने असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी पाचही मतदारसंघात ६२ उमेदवारांना १२१ उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यात आले. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमधून उमेदवारांनी उमेदवारी अर्ज घेतले. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तिसर्या दिवशी मंगळवारी जिल्ह्यात अकोला पूर्व मतदारसंघातून अपक्ष गौतम कंकाळ या एकमेव उमेदवाराचा अर्ज दाखल झाला, तर पाचही मतदारसंघात ७0 उमेदवारांना १३३ उमेदवारी अर्जांचे वाटप करण्यात आले होते.
चौथ्या दिवशी चार उमेदवारी अर्ज दाखल
By admin | Published: September 25, 2014 2:50 AM