लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहरामध्ये डुकरांनी सर्वत्र हैदोस घातला आहे. डुकरांमुळे रोगराई पसरत असल्याने मनपाने डुकरे पकडण्याची मोहीम सुरू केली. शुक्रवारी मनपा पथकाला डुकरे पकडण्यास विरोध करणाऱ्या चौघांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आणि न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघा आरोपींची कारागृहात रवानगी केली. महापालिकेचे अधिकारी अनिल बिडवे (५०) यांच्या तक्रारीनुसार महापालिकेचे पथक ८ जुलै रोजी डुकरे पकडण्याची कारवाई करीत होते; परंतु त्यांच्या पथकाला डुकरे पाळणारे बच्चनसिंग भारतसिंग बावरी (२२ रा. आनंदनगर, खदान), सूरजितसिंग बिसनसिंग पटवा (४५) रवीसिंग बलबिरसिंग टांक (२३) दोघेही राहणार सिंधी कॅम्प, बेगम मंजिलजवळ, बलमतसिंग ऊर्फ पिंटू/चिंटूसिंग बलबिरसिंग टांग (१८, रा. सरकारी गोदामजवळ, खदान) यांनी महापालिकेच्या पथकाला डुकरे पकडण्यास विरोध केला आणि शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी बिडवे यांनी पोलिसात तक्रार केली होती. कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून चौघा जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने चौघाही आरोपींची कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले.
डुकरे पकडण्यास विरोध करणाऱ्या चौघांना अटक
By admin | Published: July 15, 2017 1:36 AM