अकोला - सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडया करणाऱ्या अट्टल चोरटयास स्थानीक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. नितीन इंगळे नामक चोरटयाने चार घरफोडयांची कबुली दिली असून पोलिसांनी त्याच्याकडून ३ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.न्यु तापडीया नगरातील रहिवासी इंदीरा निखील भांडे यांच्या निवासस्थानी अज्ञात चोरटयांनी चोरी करून लाखोंचा मुद्देमाल पळविला होता, या प्रकरणी सिव्हील लाईन्स पोलिस ठाण्यात अज्ञात चोरटयांविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरु करण्यात आला. स्थानीक गुन्हे शाखेचे प्रमूख कैलास नागरे व त्यांच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी पंचशील नगरातील रहवासी नितीन इश्वर इंगळे याला अटक केली. त्याचा साथीदार विशाल भारत अंभोरे हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. नितीन इंगळे याने चार घरफोडयांची कबुली दिली असून या चारही घरफोडयातील मुद्देमाल जप्त करण्यात स्थानीक गुन्हे शाखेला यश आले आहे. यामध्ये १०४ ग्रॅम सोन्याची लगड व १३२ ग्रॅम चांदीची लगड आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, स्थानीक गुन्हे शाखा प्रमूख कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनात रणजितसिंह ठाकूर, जितेंद्र हरणे, प्रमोद चव्हाण, शक्ती कांबळे, अमीत दुबे, मनोत नागमते व मंगेश मदनकार यांनी केले.