अकोला : प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता दक्षिण - मध्य रेल्वेने जयपूर ते हैदराबाद दरम्यान २६ डिसेंबर ते १ जानेवारी २०२२ या कालावधीत चार विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या अकोला रेल्वेस्थानकावरून जाणार असल्याने अकोलेकरांची सोय होणार आहे. नांदेड विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, ०९७३७ जयपूर - हैदराबाद ही विशेष गाडी २६ डिसेंबर व २ जानेवारी रोजी जयपूर स्थानकावरून १५.२० वाजता रवाना होईल. ही गाडी २८ डिसेंबर व ४ जानेवारी रोजी हैदराबाद स्थानकावर पाेहोचणार आहे. ०९७३८ हैदराबाद - जयपूर ही विशेष गाडी २८ डिसेंबर व ४ जानेवारी रोजी हैदराबाद स्थानकावरून रवाना होऊन ३० डिसेंबर व ६ जानेवारी रोजी जयपूर स्थानकावर पोहोचणार आहे. या गाड्यांना अकोला, वाशिम, मलकापूर या स्थानकांवर थांबा असणार आहे. या गाड्यांमध्ये द्वितीय श्रेणी वातानुकुलीत, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, द्वितीय श्रेणी शयनयान, द्वितीय श्रेणी खुर्ची यान असे डब्बे राहतील.
जयपूर-हैदराबाद दरम्यान चार विशेष गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 7:33 PM